इस्लामाबाद: कधी काळी पाकिस्तानी क्रिकेट संघातून एकत्र खेळणारे दोन माजी संघ सहकारी आता राजकारणात आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादराजकारणात उतरणार आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी मियाँदादयांनी इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली.

संघाचे माजी कर्णधार जावेद मियाँदादयांनी पाकिस्तानची अवस्था वाईट झाली असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या या दुर्देशला इम्रान खान जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. इम्रान खान यांना आपणच पंतप्रधान केले आहे. आता मात्र, राजकारणात इम्रान खान यांना आपण आव्हान देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इम्रान खान हे आपले राजकारण विसरले आहेत. त्यामुळे राजकारण काय असते हे त्यांना दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे मियाँदादयांनी म्हटले. मी तुमचा कर्णधार होतो, तुम्ही माझे कर्णधार नव्हता, असा निशाणाही मियाँदादयांनी खान यांच्यावर साधला. पाकिस्तानची बिकट अवस्था झाली आहे. इम्रान खान यांनी जी स्वप्ने दाखवून सत्ता काबीज केली. त्यातील काहीच साध्य झाले नाही. इम्रान खान यांनी विश्वासघात केला असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले. लोकांना रोजगार देण्यास इम्रान खान अपयशी ठरले असून लोकांचा असलेला रोजगारही खान यांनी हिरावून घेतला असल्याची टीका त्यांनी केली.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नियुक्तीवरून मियाँदादयांनी इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा कारभार चालवण्यास पाकिस्तानमधील नागरीक सक्षम आहेत. त्यामुळे परदेशातील नागरिकांची काहीही आवश्यकता नसल्याचे मियाँदादयांनी म्हटले. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा कारभार चुकीच्या हातात गेला आहे. त्याचा परिणाम पाकिस्तान क्रिकेटवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. मियाँदादयांनी पाकिस्तानी लष्कराचेही कौतुक केले. पाकिस्तानमधील लष्करामुळे देश एकसंध असल्याचे त्यांनी म्हटले. पाकिस्तानी नागरिकांनी सरकारविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी केले.

वाचा:

जावेद मियाँदादयांनी याआधी पाकिस्तानला कर्ज मुक्त करण्यासाठी एक बँक खाते सुरू करण्याचा निर्णय घेतला. मियाँदाद यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओद्वारे देशाला कर्जातून बाहेर काढण्यासाठी त्यांची योजना सांगितली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज कमी करण्यासाठी मी तुमच्याकडून भीक मागतो, असे ते म्हणाले. आतापर्यंत देशातील लोकांनी मोठा भ्रष्टाचार करून पैसा लुटला. आता देशाला कर्जातून बाहेर काढण्यासाठी दान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मी तुमच्याकडून भीक मागतोय. माझ्यासाठी नाही तर देशासाठी आहे. नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानमध्ये एक खाते उघडणार आहे. यात देशातील आणि विदेशातील पाकिस्तानी लोकांनी पैसे जमा करावेत, असे आवाहन मियाँदाद यांनी केले.

यांनी पाकिस्तानकडून १२४ कसोटी सामने आणि २३३ एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. १९९२ च्या विश्वचषक विजयी संघात त्यांचा सहभाग होता. मियाँदाद यांच्या मुलाचा विवाह कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुलीसोबत झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here