तासगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर ते विजापूर या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. तासगाव तालुक्यात येळावी ते तासगाव कॉलेज दरम्यान काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे काम रखडले आहे. थांबलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी भूमी अभिलेख विभाग, भूसंपादन विभाग आणि महामार्गाचे काम करणाऱ्या ध्रुव कन्सल्टन्सीचे कर्मचारी गुरुवारी दुपारी नेहरूनगर येथे पोहोचले. जमीन मोजणीचे काम सुरू करताच परिसरातील काही शेतकऱ्यांनी याला विरोध () केला. यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेला शेतकरी महादेव घाडगे हा शिवीगाळ करीत कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. लोखंडी गजाने डोक्यावर प्रहार केला. यात भूसंपादन विभागातील कर्मचारी उदय जगताप जखमी झाले, तर अनिल घोडेस्वार या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. यानंतर त्याने जमीन मोजणीच्या मशीनचीही तोडफोड केली.
जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. भूसंपादनास विरोध आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याबद्दल भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन महादेव घाडगे या शेतकऱ्याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी घाडगे याच्यावर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I really like and appreciate your blog post.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.