रायपूर: पतीने पत्नीची त्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह पलंगात लपवून ठेवला. इतकंच नाही तर तो दोन दिवस त्याच पलंगावर झोपला. छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील लालपूरमध्ये घडली आहे. याप्ररकणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. बबिता साहू असं मृत महिलेचं नाव आहे. तर, आरोपी पतीचं नाव कीर्तन साहू असल्याची माहिती आहे.या प्रकरणाची माहिती देताना टिकरापारा पोलिस स्टेशनचे प्रभारी अमित बेरिया यांनी सांगितले की, ११ मे रोजी संध्याकाळी बबिता आणि कीर्तन साहू यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. १२ मे रोजी संध्याकाळी, पतीने तक्रार केली आणि सांगितले की कोणीतरी त्याच्या पत्नीची हत्या केली आणि तिचा मृतदेह पलंगात लपवून ठेवला. आरोपी कीर्तन साहूचं हे नाटक पोलिसांसमोर फार काळ टिकू शकले नाही. पोलिसांनी प्राथमिक तपासातच त्याला हत्येच्या आरोपीखाली अटक केली.

धुमधडाक्यात लग्न, दुसऱ्याच दिवशी नववधू खोलीतून ओरडत बाहेर आली, सत्य कळताच लग्नघरी सन्नाटा…
या दोघांचंही हे दुसरं लग्न असल्याची माहिती आहे. लग्नानंतर दोघं एकत्र राहत असले तरी त्यांच्यात सतत भांडणं होत असायची. आरोपी कीर्तन साहूला दारुचं व्यसन होतं. यावरूनही दोघांमध्ये वाद व्हायचे. याप्रकरणी विचारपूस केल्यानंतर टिकरापारा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

हत्येनंतर दोन दिवस त्याच पलंगावर झोपला

पत्नी बबिता यांची हत्या केल्यानंतर कीर्तन साहू घरातील त्याच पलंगावर झोपला होता. अतिशय हुशारीने त्याने हत्येचा कट रचला. त्यानंतर हत्या केल्यानंतर तो तक्रारदार म्हणून पोलीस ठाण्यात गेला. मात्र तिथेच त्याचा डाव फसला. मृतदेहाचा वास आल्यानंतर तो स्वत: पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेला. पण, पोलिसांनी त्याचं खोटं पकडलं आणि त्याला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here