राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या होत आहेत. यामुळे या निवडणूक निकालाची सर्वांना उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सरशी होते की भाजपची हे या निकालातून स्पष्ट होणार आहे. खास करून नागपूरचा गड राखण्यात भाजपला यश येणार का? याकडे लक्ष आहे.
जिल्हा परिषदेसाठी पालघर जिल्ह्यातल्या ८ तालुक्यांमध्ये ६४ टक्के, धुळे जिल्हा परिषद आणि ४ पंचायत समित्यांसाठी जवळपास ६० टक्के मतदान झालं आहे.
पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत आहे. नागपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, नंदुरबारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, धुळ्यात अनिल गोटे विरुद्ध भाजप तर, अकोल्यात चौरंगी लढत होतेय. भाजप, शिवसेना, वंचित आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सामना होतोय. वाशिममध्ये बहुरंगी लढत बघायला मिळते आहे. यामुळे या सहा जिल्हा परिषदांच्या निकालांना महत्त्व आलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times