जयपूरमध्ये एक व्यक्ती पत्नी, ४ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांच्या मुलासोबत राहतो. तो रद्दीचं काम करतो आणि त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. नशा करण्यासाठी त्याने एका व्यक्तीकडून काही पैसे घेतले होते, जे तो परत करू शकला नाही.
भीक मागायला लाव आणि आपले पैसे वसूल कर, मग परत कर
वडिलांचे हे घृणास्पद कृत्य उघडकीस आल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. तर दुसरीकडे पैसे देणारी व्यक्ती वारंवार पैशांसाठी तगादा लावायची. त्यामुळे या व्यक्तीने आपली मुलगी कर्ज देणाऱ्याकडे गहाण ठेवलं आणि सांगितलं की भीक मागायला लाव आणि आपले पैसे वसूल कर, त्यानंतर परत करशील.
आतापर्यंत मुलीने ४५०० रुपये दिले आहेत
यानंतर ती व्यक्ती या चिमुकलीला घेऊन निघाली. त्यानंतर ही चिमुकली रोज भीक मागायची आणि रोज १०० रुपये आणून त्याला द्यायची. आतापर्यंत तिने ४५०० रुपये दिले आहेत. त्यानंतर ही चिमुकली त्याच्या ६ वर्षांच्या भावासोबत कोटा येथे फिरताना आढळले.
समुपदेशनात लाजिरवाण्या गोष्टी समोर आल्या
हे दोघेही रेल्वे कॉलनी परिसरात फिरत असल्याचे पाहून नगरसेवकाने पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी दोघांची चौकशी करून त्यांना बाल कल्याण समितीकडे नेले. समिती सदस्य अरुण भार्गव यांनी मुलांचे समुपदेशन केले तेव्हा लाजीरवाणी बाबी समोर आल्या.
मुलाने सांगितले की त्याची आई अपंग आहे आणि वडील मद्यपी आहेत. उधार घेतलेले पैसे फेडण्यासाठी त्याने बहिणीला गहाण ठेवले होते. दुसरीकडे, अरुण भार्गव यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, एसपी ग्रामीण आणि एसपी शहर आमच्याकडे आले होते. याप्रकरणी पोलीस आरोपी बाप आणि कर्ज देणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करणार आहेत.