नवनीत राणा यांना ६ ऑगस्ट रोजी करोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे त्यांना घरीच क्वॉरंटाइन करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ११ ऑगस्ट रोजी नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागल्याने मुंबईला हलवण्यात येत आहे. त्यांना मुंबईत आणण्यासाठी विमानाची व्यवस्था करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला वेळ लागणार असल्याने तातडीने त्यांना बाय रोड मुंबईत आणण्यात येत आहे. दोन तासांपूर्वीच नवनीत राणा यांनी मुंबईला येण्यासाठी नागपूर सोडले आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती, आमदार रवी राणा आहेत. नवनीत राणा यांना मुंबईत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. रवी राणा यांच्यासह त्यांची दोन्ही मुले, सासू-सासऱ्यांसह कुटुंबातील १२ जणांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर उपाचर सुरू आहेत. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवरही वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू असून मुलांवर घरीच अमरावतीला उपचार सुरू आहेत.
नवनीत राणा या खासदार असल्याने त्यांना मतदारसंघात फिरावे लागते. करोनाचं संकट असल्याने करोना परिस्थितीचा आढावा घेतानाच विभागांमध्ये जाऊन परिस्थितीची माहिती घेण्याचं काम त्या करत होत्या. शिवाय त्यांनी मतदारसंघात स्वत: धूर फवारणी केली होती. सतत कार्यकर्ते आणि मतदारांच्या त्या संपर्कात होत्या. त्यामुळेच त्यांना करोनाची लागण झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला आहे. दरम्यान, करोना संकटाच्या काळात आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि अत्यावश्यक वस्तूच्या वाटपासाठी काही भागांत दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार नवीनत राणाही त्यांच्यासोबत होत्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
A big thank you for your article.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.