सोलापूर : कर्नाटक विधानसभेत काँग्रेसने पूर्ण बहुतम प्राप्त केले आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? हा तिढा निर्माण झाल्याने काँग्रेस हायकमांडने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंवर जबाबदारी सोपवली आहे. रविवारी दुपारी शिंदे हे तातडीने बेंगळुरूला रवाना झाले आहेत. याबाबत सोलापुरातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी सुशीलकुमार शिंदे बेंगळुरूला गेल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवल्यानंतर कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. या ऐतिहासिक कामगिरीचे हिरो असलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार या दोघांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. तो तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसने पक्षनिरीक्षक म्हणून माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.कर्नाटकात मुख्यमंत्री होइपर्यंत शिंदे ठाण मांडून बसणार

कर्नाटकचा मुख्यमंत्री निवडीपर्यंत शिंदे हे बेंगळुरूमध्ये ठाण मांडून बसणार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडविण्याची मोठी जबाबदारी शिंदे आणि त्यांच्या दोन जोडीदारांवर टाकण्यात आलेली आहे. सोलापुरातील सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने सुशीलकुमार शिंदे यांना बेंगलोरकडे रवाना व्हावे लागले. याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता असे समजले की, काँग्रेस नेते सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय सरचिटणीस के. वेणुगोपाल यांना तातडीने सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क करून त्यांना बेंगळुरूकडे बोलावले आहे. शिंदे यांना त्वरित बेंगळुरूकडे जाण्यासाठी काँग्रेस पक्षाने खास चार्टर्ड विमान पाठवल्याची माहिती मिळाली आहे. त्या विमानाने शिंदे हे बेंगळुरूकडे रवाना झाले आहेत.
Karnataka Election Result : कर्नाटकमध्ये काँग्रेसला विजय मिळवून देणारे ४ चाणक्य कोण? पडद्यामागे राहून मारली बाजी
कर्नाटकात सत्ता स्थापनेत शिंदें परिवाराचा महत्त्वाचा वाटा

कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी सुशीलकुमार शिंदे यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पक्षाने दावणगिरी जिल्ह्यातील मतदारसंघाची जबाबदारी दिली होती. त्यामध्ये आठ पैकी सात जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. यावरून सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे कर्नाटकातील सर्व नेत्यांशी संबंध पाहता कर्नाटकमधील सत्ता स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असेल, असे मानले जात आहे.

नळाला पाणी आलं, इलेक्ट्रिक मोटार लावायला गेला अन् घात झाला, आई-वडिलांनी हंबरडा फोडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here