मुंबईः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक यानिवासस्थआनी दाखल झाले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशी मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी पार्थ पवार यांना थेट सुनावले होते. पार्थ पवार हे ‘इमॅच्युअर’असल्याचं शरद पवार म्हणाले होते. यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बुधवारी बैठक झाली होती. यानंतर अजित पवार काहीच बोलले नाही. त्यानंतर आता पार्थ पवार हे थेट शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवारांची कन्या सुप्रीया सुळेही या बैठकीला उपस्थित आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार हे चर्चेत आहेत. पारनेरमधील शिवसेनेचे आमदार फोडल्यापासून पार्थ पवार हे चर्चेत आलेत. हा विषय मिटत नाही तोच राम मंदिराच्या मुद्द्यावर जाहीर समर्थन करणारं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर त्यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्ये प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पार्थ पवार यांनी पक्षाशी विसंगत भूमिका मांडल्याने राष्ट्रवादीत गटतट पडले की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर अखेर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करत चर्चेला पूर्ण विराम दिला. सोबतच शरद पवार यांनी पार्थ पवारना जाहीरपणे सुनावलं. पार्थ पवार हे इमॅच्युअर आहेत.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शरद पवार यांनी उघडपणे नातू पार्थ पवारला फटकारल्यानंतर अजित पवार हे बुधवारी तातडीने शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले होते. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा चालली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी उशिरा पवार शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here