अमरावती: रस्त्याने पायी जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला अडवून धमकी देऊन तिची छेड काढण्यात आल्याची घटना घडली आहे. तुझ्या मैत्रिणीला बाहेर काढ, आपण दोघे रुममध्ये राहू, असे म्हणून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली. जबरीने तिचा मोबाइल क्रमांकही घेण्यात आला. ही धक्कादायक घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तू मित्रासोबत रात्री फिरते, पोलिसांत सांगेन म्हणत मुलीला धमकावलं

एक अल्पवयीन मुलगी रात्री रस्त्याने पायी तिच्या खोलीकडे जात होती. त्यावेळी अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयोगटातील एक अनोळखी व्यक्ती तेथे दुचाकीसह उभा होता. त्याने तिला आवाज दिला. एवढ्या रात्री का फिरत आहे, अशी विचारणा त्याने केली. त्यावर, काका मला मेडिकलचे काम आहे, त्यामुळे मी बाहेर गेली होती, असे तिने सांगितले. त्यावर त्याने तू तुझ्या मित्रासोबत रात्रीला फिरते, तुझा पोलिसांत रिपोर्ट देईल, अशी धमकी दिली.

अल्पवयीन मुलगी रात्री उशीरा घरी आली, मध्यरात्री पोटात भयंकर वेदना, डॉक्टरकडे नेताच आई हादरली
‘फिजिकल रिलेशन ठेऊ दे, मी तुला पैसे देईन’

त्यावरच न थांबता त्याने फिजिकल रिलेशन ठेऊ दे, मी तुला पैसे देईन, तुझ्या मैत्रिणीला रुमबाहेर काढ, आपण दोघे रुममध्ये राहू, असे म्हणत पीडित मुलीकडून तिचा मोबाइल क्रमांक बळजबरी घेतला. त्यानंतर त्याने पीडित मुलीच्या मोबाइलवर मिसकॉल दिला आणि तिचा हाथ पकडला. या प्रकाराने घाबरलेल्या पीडित मुलीने त्याच्या हाताला झटका देत तेथून पळ काढून रुम गाठली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या धक्क्यातून सावरल्यावर पीडित मुलीने तात्काळ गाडगेनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here