नवी दिल्ली : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये हिंसाचार सुरू होता. मात्र, याचा परिणाम भारताच्या ब्रिज खेळाडूंच्या पाहुणचारात कुठलाही फरक पडला नाही. लाहोरमध्ये भारतीय खेळाडूंची पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती.भारताचा ३२ सदस्यीय ब्रिज संघ पाकिस्तानात आहे. या संघात किरण नाडार, एचसीएचे संस्थेचे संस्थापक शिव नाडार, अनुभवी खेळाडू राजेश्वर तिवारी यांचा सहभाग होता. तिवारी यांनी एशियाड स्पर्धेत सहभाग घेतला होता. आशियाई ब्रिज संघटना आणि मिडल इस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या खुल्या गटात भारतीय संघाने सुवर्णपदक मिळवले होते. भारतीय संघाने चारही गटांत सुवर्णयश मिळवले. याच दरम्यान पाकिस्तानमध्ये हिंसाचार उसळला. याचा परिणाम भारतीय खेळाडूंवरही होण्याची शक्यता होती. त्यामुळे थोडे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आयोजकांनी भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कुठलीही कसूर केली नाही. ‘वाघा बॉर्डरमार्गे आम्ही पाकिस्तानात पोहोचल्यापासून आमच्या सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात आले होते. पाकिस्तान ब्रिज संघटनेचे अध्यक्ष बॉर्डरवर आमच्या स्वागतासाठी आले होते. स्पर्धेचा दर्जा उच्च नसला, तरी आमच्या सेवेत कुठलीही कुचराई दिसली नाही. त्यामुळे हा अनुभव वेगळाच होता. कारण, आम्ही परदेशातही स्पर्धेसाठी गेलो आहोत. त्यापेक्षा इथे नक्कीच चांगल्या सोई-सुविधा होत्या,’ असे तिवारी यांनी सांगितले.

प्रेक्षकांनीचं केलं प्रेरकला जखमी, तरीही मॅचविनिंग खेळी करून संघाला जिंकवलं; वाचा नेमक काय घडलं

भारतीय पथक ४ मे रोजी लाहोरला पोहोचले होते. त्यानंतर संघातील अनेक सदस्य रविवारी मायदेशी परतले. यातील काही जण शनिवारीच परतले. तत्पूर्वी, खान यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानातील वातावरण बदलले होते. त्यामुळे खेळाडूंना पंचतारांकित हॉटेलच्या आतमध्येच राहण्यास सांगण्यात आले होते. त्याआधी भारतीय खेळाडूंना लाहोरमधील काही प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. या स्पर्धेत भारत, पाकिस्तानसह यूएई, जॉर्डन, बांगलादेश आणि पॅलेस्टिनचे संघ सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here