आंबेगाव, पुणे : मासेमारी करण्यासाठी बंधाऱ्याच्या पाण्यात विजेचा करंट सोडणं मच्छिमाराच्या अंगलट आलं. मासेमारी करताना तरुणाचाच विजेचा जोरदार धक्का लागून मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.प्रकाश भिमाजी मधे (वय ५० वर्ष) असे मासेमारी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. विजेचा करंट बसल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत त्यांच्या पत्नी सविता मधे यांनी फिर्याद दिली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील टाव्हरेवाडी येथे ही घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश मधे आणि त्यांची पत्नी सविता मधे हे त्यांच्या कुटुंबासह जवळपास ४० वर्षांपासून आंबेगाव तालुक्यातील टाव्हारेवाडी येथे उत्तम टाव्हरे यांच्याकडे शेत मजूर म्हणून काम करतात. ते नेहमी जवळ असणाऱ्या बंधाऱ्यावर मासेमारी साठी जात होते.

गर्भवती प्राध्यापिकेने आयुष्य संपवलं, पतीच्या व्हॉट्सअप चॅटमुळे अनैतिक संबंध कोर्टात उघड
मासेमारी करण्याअगोदर ते नेहमी बंधाऱ्याच्या जवळ असणाऱ्या लाईटच्या डी पी वरून वायर जोडून त्या वायर मधून येणारा विजेचा करंट पाण्यात सोडत. मासे बेशुद्ध करून ते मासेमारी करत असत.

शॉक लागलेल्या व्यक्तीला वाचवणाऱ्या मुस्लीम बांधवांचा जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडिओ शेअर

रविवारी मासेमारी करत असताना प्रकाश मधे हे बंधाऱ्याच्या पाण्यात पडल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्या जवळ काळ्या रंगाची वायर व ती वायर लाईटच्या डीपीला जोडलेली दिसली. त्यानंतर उत्तम तुकाराम टाव्हरे व ग्रामस्थांनी ती वायर डीपीतुन काढुन प्रकाश मधे यांना पाण्याच्या बाहेर काढले.

Jalgaon News : लग्न सोहळ्यावरुन परतताच आक्रित, विवाहितेचा मृत्यू, कारण महाराष्ट्राची धाकधूक वाढवणारं
त्यानंतर त्यांना मंचे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावरून मंचर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र पाण्यात विजेची वायर सापडल्याने विजेचा शॉक बसूनच मृत्यू झाला असल्याचे अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here