मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुप्रीम कोर्टाने सेनेच्या आमदारांच्या निलंबनाबाबत दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभूतीची लाट वाढली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये आलेले नवचैतन्य यासह महाविकास आघाडीची एकजूट हे सर्व पाहता राज्यातील शिंदे फडणवीस सरकार मुंबई महापालिका निवडणुका सध्या घेण्याच्या मनस्थितीत नाही, असं चित्र आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका अगोदर ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता होती त्या आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती कमी होण्याची आणि मविआमध्ये फूट पडण्याची संधी शोधली जात आहे. त्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

टाइम्स ऑफ इंडियातील एका वृत्तानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यानं मुंबई महापालिका निवडणूक पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे, असं म्हटलंय. सुप्रीम कोर्टाने निकालपत्रात तत्कालीन राज्यपालांवर उडलेले ताशेरे, आमदार भरत गोगावले व्हीप म्हणून आणि एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून केलेली नियुक्ती सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर ठरवणं यामुळे जनमतावर झालेला परिणाम या मुंबई महापालिका निवडणुकीबाबत भाजप देखील सावध भूमिका घेत आहे.
Pune News : मासेमारीसाठी पाण्यात करंट सोडणं अंगलट, पुण्यात मच्छिमाराचाच तडफडून मृत्यू
महाराष्ट्रातील २३ महापालिका आणि २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबल्या आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये प्रशासकांतर्फे कारभार सुरु आहे. मुंबईत मार्च २०२२ पासून प्रशासक कारभार पाहत आहेत. सुरुवातीला करोना महामारी, ओबीसी आरक्षणामुळं निवडणुका लांबल्या होत्या. त्यानंतर वार्ड फेररचनेच्या प्रकरणामुळं निवडणुका लांबल्या आहेत. मुंबई हायकोर्टानं मुंबईतील वॉर्डची संख्या २३६ वरुन २२७ ठेवण्याच्या निर्णयाला वैध ठरवल्यानं त्यानंतर ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाची प्रकरणं देखील सुप्रीम कोर्टात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार

ठाकरेंच्या सहानुभूतीत वाढ

गेल्या वर्षी जूनमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतर त्यांच्याबद्दलची सहानुभूती लाट निर्माण झालेली आहे. ठाकरेंना पक्ष गमवावा लागल्यानंतर देखील सहानुभूती वाढली होती. आता सुप्रीम कोर्टानं १६ आमदारांच्या निलंबनाबाबत निर्णय घेण्यास अध्यक्षांना सांगितलं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंबद्दलच्या सहानुभूतीमध्ये वाढ झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत निवडणुका घेतल्या तर याचा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फटका बसू शकतो, असं राजकीय विश्लेषक बिरजू मुंद्रा यांनी सांगितलं.

Mumbai News: पावसाळ्यात मुंबईत दरडी कोसळण्याचे भय, या ७४ हॉटस्पॉटवरील नागरिकांना रेड अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here