पुणे : पुण्यातील खडकवासला धरणामध्ये बुडून दोघी जणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धरणात पोहोण्यासाठी उतरलेल्या आठ ते नऊ जणींपैकी काही मुली बुडाल्या होत्या. यापैकी दोघींचे मृतदेह सापडले आहेत, तर दोघींचा शोध सुरु असून त्यांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.प्राथमिक माहितीनुसार आठ ते नऊ मुली या खडवासला येथे लग्न कार्यासाठी आल्या होत्या. लग्न कार्यालयाचा मंडप हा धरणाच्या शेजारी होता. यावेळी खडकवासला धरणामध्ये मुली पोहोण्यासाठी गेल्या असल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत आज सकाळी पोहण्यासाठी उतरलेल्या नऊ मुली बुडत होत्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले, तर दोन मुली अद्याप सापडल्या नाहीत. हवेली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल होत आहेत.

गर्भवती प्राध्यापिकेने आयुष्य संपवलं, पतीच्या व्हॉट्सअप चॅटमुळे अनैतिक संबंध कोर्टात उघड
दरम्यान कालच खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कालव्यात पोहण्यासाठी आलेला तरुण बुडाल्याची माहिती आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नांदेड सिटी अग्निशमन केंद्राच्या जवानांकडून त्याचा शोध सुरू आहे. जुबेर इस्माईल शेख (वय २८ वर्ष, रा. भवानी पेठ, पुणे) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

पदरात पाच महिन्यांची लेक, निवृत्त पोलिसाच्या सुनेचा गूढ मृत्यू, माहेरच्या मंडळींना संशय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here