मुंबईः करोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे, गेल्या २४ तासांत तब्बल ११ हजार ८१३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आज ४१३ करोना मृतांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वाधिक मृतांचा आकडा नोंदवला गेला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

राज्यात शहरासह ग्रामीण भागांतही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आज देखलील मोठ्या संख्येनं बाधित रुग्ण आढळले आहेत. आत ११ हजार ८१३ नवीन रुग्ण आढळल्यानं राज्यातील एकूण रुग्णसंख्या ५ लाख ६० हजार १२६च्या घरात पोहोचली आहे. तर, मुंबई महापालिका हद्दीत १ हजार २०० रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. राज्यात सध्या १० लाख २५ हजार ६६० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ३६ हजार ४५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचाः

राज्यात आज ४१३ करोना मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण करोना मृतांचा आकडा आता १९ हजार ०६३वर पोहोचला आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ इतका झाला आहे. आज नोंद झालेल्या ४१३ करोनामृत्यूंपैकी २८८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५१ मृत्यू ठाणे जिल्हा-३१, जळगाव-४, पुणे-३, नाशिक-३, पालघर-३, लातूर-२, उस्मानाबाद-२, रायगड-१, वाशिम-१ आणि औरंगाबाद-१ असे आहेत.

वाचाः

राज्यात करोना रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे. आज ९ हजार ११५ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्णांनी करोनाची लढाई यशस्वी जिंकली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ६९.८ टक्के इतका झाला आहे. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ०९० चाचण्यांपैकी नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here