ठाणे : ठाण्यात पहिल्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.ठाण्यातील नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनीमध्ये ही भीषण दुर्घटना घडली. अमर टॉवर या तळमजल्यासह ७ मजली इमारतीत हा प्रकार घडला. पहिल्या मजल्यावरील रूम नं. १०१ चा स्लॅब कोसळला.

या दुर्घटनेमध्ये तिघे जण जखमी झाले आहेत. यामध्ये १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातग्रस्त अमर टॉवर या इमारतीचे बांधकाम २५ वर्षे जुने आहे.

Jalgaon News : लग्न सोहळ्यावरुन परतताच आक्रित, विवाहितेचा मृत्यू, कारण महाराष्ट्राची धाकधूक वाढवणारं

जखमींची नावे

१) प्रथमेश सूर्यवंशी (२८ वर्षे)
२) विजया सूर्यवंशी (५४ वर्षे)
३) अथर्व सूर्यवंशी (१४ वर्षे)

रूम नं. १०१ चा स्लॅब कोसळल्याने तळ मजल्यावरील रूम नं. ०१ च्या स्लॅबलाही काही प्रमाणात तडे गेले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.

पुण्यात सातारा रस्त्यावर मध्यरात्री स्फोट, २ मजली इमारत ढासळली; दोनजण जखमी

स्लॅब कोसळल्यानंतर एकूण पाच जण अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे (TDRF) जवानांनी धाव घेत अडकलेल्या ५ जणांना बाहेर काढले. त्यातील ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Nashik Accident : हॉटेलच्या शोधात निघालेल्या मित्रांची बाईक एसटीवर धडकली, दोघांचा करुण अंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here