मुंबई : महागाईच्या आघाडीवर आता मोठा दिलासा मिळाला आहे. एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर शून्याच्या खाली राहिला आहे. घाऊक महागाई दर (WPI) एप्रिलमध्ये -०.९२% वर आला असून यापूर्वी मार्च २०२३ मध्ये घाऊक महागाई दर १.३४% होता. तर फेब्रुवारी २०२३ मध्ये घाऊक महागाई दर ३.८५ टक्के होता. उल्लेखनीय आहे की घाऊक महागाई दरात घट झालेला हा सलग ११वा महिना असून खाद्यपदार्थ आणि इंधन तसेच विजेच्या किमतीत घट झाल्यामुळे घाऊक महागाई कमी झाली.

एप्रिलमध्ये अन्नधान्य महागाईत घट
सरकारने सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. एप्रिलमध्ये घाऊक महागाईचा दर ३४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. अन्नधान्य महागाई एप्रिलमध्ये २.३२ टक्क्यांवरून ०.१७% वर आली आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या महागाईचा दर २.४० टक्क्यांवरून १.६० टक्क्यांवर आला आहे. तर इंधन आणि उर्जेचा घाऊक महागाई दर ८.९६ टक्क्यांवरून ०.९३% वर आला असून उत्पादित उत्पादनांचा महागाई दर -०.७७ टक्क्यांवरून -२.४२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

महागाईपासून दिलासा, आता तरी कर्ज स्वस्त होणार का? RBI गव्हर्नरांनी एका वाक्यात उत्तर दिलं!
किरकोळ महागाईही घटली
केवळ घाऊक महागाई दरच नाही तर किरकोळ महागाई दरातही घट झाली आहे. एप्रिलमध्ये किरकोळ महागाई १८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली होती असताना सरकारी आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर ४.७०% वर आला आहे. तर एक महिन्यापूर्वी मार्च २०२३ मध्ये हा आकडा ५.७ टक्के होता. खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे आणि वीज आणि इंधनाच्या किमतीत घट झाल्यामुळे किरकोळ महागाईत घट झाली आहे. घाऊक महागाई आणि किरकोळ महागाई कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिलमध्ये रेपो दर अपरिवर्तित ठेवला.

सर्वसामान्यांना अजून काही काळ महागाईचे चटके बसणार, खिशावरचा बोजा वाढणार; वाचा सविस्तर
२०२२-२३ मध्ये घाऊक महागाई
महिना – महागाई दर
एप्रिल – १५.०८%
मे – १५.८८%
जून – १५.१८%
जुलै – १३.९३%
ऑगस्ट – १२.४१%
सप्टेंबर – १०.७०%
ऑक्टोबर – ८.३९%
नोव्हेंबर – ५.८५%
डिसेंबर – ४.९५%
जानेवारी – ४.७३%
फेब्रुवारी – ३.८५%
मार्च – १.३४%
एप्रिल – ०.९२%

महागाईवर भव्य सभा, राहुल गांधींकडून पीठाचा २२ रुपये लीटर असा उल्लेख, व्हिडिओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here