जयपूरः राजस्थानमधील सरकारमधील दीर्घकाळ चालत असलेले राजकीय संकट संपुष्टात आले आहे. पण वरिष्ठ स्तरावर अजून कटुता दिसत आहे. बंडखोरी आणि वादानंतर परतलेले आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची भेट झाली. यानंतर अशोक गहलोत यांनी बोलकं वक्तव्यं केलं. १९ आमदारांशिवायही आम्ही बहुमत सिद्ध केले असते, असं अशोक गहलोत म्हणाले.

राज्यात दोन्ही नेत्यांमध्ये वाद बराच काळ कायम राहिला आणि कॉंग्रेस हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर हा वाद आता संपुष्टात आला आहे. हा वाद संपल्यानंतर दोन्ही नेत्यांची आज भेट झाली.

विधानसभा अधिवेशनापूर्वी भेट

राजस्थान विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर या अधिवेशनच्या तोंडावर दोन्ही नेते एकत्र आले. यासह कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली. त्यामध्ये सचिन पायलट आणि अशोक गहलोत गटातील सर्व आमदार उपस्थित होते. या दरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांनीही भेट झाली. कॉंग्रेस स्वत: विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडेल, अशी घोषणा या बैठकीत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली.

विधानसभेतच विश्वासदर्शक ठारव आम्हीच मांडू, असं पायलट यांची भेट घेतल्यानंतर गहलोत म्हणाले. यानंतर गहलोत यांच्या बोलण्यातून काहीशी नाराजी दिसून आली. जे घडलं ते सर्व विसरलं पाहिजे. पण या १९ आमदारांशिवायही आम्ही बहुमत सिद्ध केले असते, असं गहलोत म्हणाले. ‘कुठल्याही आमदारांची काही तक्रार असल्यास ती दूर केली जाईल. आता भेटायचं असेल आताही ते भेटू शकतात. नंतर भेटूनही ते बोलू शकतात, असं गहलोत यांनी सांगितलं.

भाजप अविश्वास प्रस्ताव आणणार

राजस्थानमध्ये शुक्रवारपासून विधानसभेचे अधिवेश सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजपची एक महत्त्वाची बैठक झाली. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही भाजपच्या या बैठकीला हजेरी लावली. तर या बैठकीत केंद्रीय नेतृत्वातील प्रतिनिधीही सहभागी झाले होते.
विधानसभेत उद्या अविश्वास ठराव आणला जाईल. अशा परिस्थितीत अशोक गहलोत सरकारसमोर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे, असं बैठकीनंतर भाजपकडून सांगण्यात आलं.

विधानसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी गेहलोत सरकार बंडखोर आमदारांना एकत्र आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एका आदेशानुसार गुरुवारी सचिन पायलट गटातील दोन मोठे चेहरे भंवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंग यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here