गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये महिलेनं पोलिसांना फोन करुन पतीनं औषधाच्या काही गोळ्या खाल्ल्याची आणि त्यानंतर तो उठलाच नसल्याची माहिती दिली. पोलीस घरी पोहोचले, तेव्हा एरिकच्या मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात वाटला. मात्र तपासातून वेगळीच माहिती समोर आली. रिचिन्सनंच एरिकची हत्या केली होती. नशेच्या ओव्हरडोसमुळे एरिकचा जीव गेला.
रिचिन्सनं घरात एक पार्टी ठेवली. तिनं पतीच्या वोडकामध्ये नशेच्या गोळ्या टाकल्या. तिनं पार्टीत स्वत:देखील मद्यपान केलं. पतीच्या मृत्यूनंतर ती रात्रभर पार्टी करत होती. या पार्टीला तिचा मित्रपरिवार उपस्थित होता. एरिक आणि रिचिन्स यांच्यात अनेकदा वाद झाले होते. त्यांच्या मित्रांनी बऱ्याचदा हे वाद मिटवले. रिचिन्सला एरिकपासून स्वत:ची सुटका करून घ्यायची होती. त्यासाठी तिनं पार्टी ठेवली आणि त्याच दरम्यान पतीचा जीव घेतला.
रिचिन्सनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तपासातून सत्य उघडकीस आलं. महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. सध्या ती तुरुंगात आहे. तिनं तुरुंगात असताना एक पुस्तक लिहिलं. मृत्यूनंतर दु:खाशी झुंजणं अतिशय अवघड असतं असं तिनं पुस्तकात लिहिलं आहे. ‘आर यू विथ मी?’ असं पुस्तकाचं नाव आहे.