म. टा. प्रतिनिधी, पुणेः शहर जिल्ह्यात २३८८ रुग्णांची नोंद झाल्याने पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र गुरुवारी दिसले. शहर जिल्ह्यात ७० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर पुणे शहरात ११५६ जणांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. रुग्णसंख्या वाढत असली तर सक्रीय रुग्णांची तसेच गंभीर रुग्णांच्या संख्येत फारशी भर पडली नसल्याचे दिलासादायक चित्र दिसून आले. (Coronavirus update in pune)

शहरातील रुग्णसंख्येत गुरुवारी कालच्या तुलनेत पुन्हा घसरण झाली असली तरी एकूण रुग्णसंख्येने सत्तर हजारांचा आकडा पार केला आहे. तर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख १७ हजाराच्या पुढे गेली आहे. शहरात६३३५ जणांची गुरुवारी चाचणी घेण्यात आली. त्यामुळे चाचण्यांची शहरातील संख्या ३ लाख ४२ हजार ५८९ एवढी झाली आहे. गंभीर रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत नसल्याचे चित्र आहे.

त्या उलट न्यूमोनिया होत असल्याने ऑक्सिनज पातळी खालावल्याने रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवावे लागते. त्यामुळे ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या २५६४ पर्यंत पोहोचली आहे. ७३७ पैकी ४४८ रुग्ण व्हेंटिलेटर वर तर अतिदक्षता विभागा २८९ रुग्ण आहेत. एका दिवसात शहरातील रुग्णालयांतून ११५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ५३ हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. सद्या १४ हजार ७१२ एवढे रुग्ण सक्रीय आहेत.

दरम्यान, राज्यात करोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे, गेल्या २४ तासांत तब्बल ११ हजार ८१३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आज ४१३ करोना मृतांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वाधिक मृतांचा आकडा नोंदवला गेला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here