चंद्रपूर : शेतात मिरची आणि मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या वडिलांना विद्यूत शॉक लागला. वडिलांना वाचविण्यासाठी मुलगा धावून गेला. पण तोही अडकला. पती, मुलाला बघून पत्नीने आरडाओरड केली. आवाज ऐकून शेतातील लोक धावून गेले. त्यांनी विद्युत प्रवाह खंडित केला. पण या घटनेनं पित्याचा मृत्यू झाला. तर मुलगा गंभीररित्या जखमी झाला. यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सावली तालुक्यातील सोनापूर शिवारात आज ( सोमवारी ) पाच वाजताच्या सुमारास घडली. तेजराव दादाजी भुरसे (वय ६२) असे मृतक शेतकऱ्याचं नाव आहे. दिनेश तेजराव भुरसे (वय ३२) असे जखमीचे नाव आहे. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Akola Crime: पतीच्या डोक्यात शिरलं भलंतच खूळ, पत्नीसाठी अख्खं गाव हादरवलं; आधी गोळीबार केला नंतर…
प्राप्त माहितीनुसार, सावली तालुक्यात येणाऱ्या सोनापूर येथील तेजराव भुरसे यांनी आपल्या शेतात मिरची व मका पिकाची लागवड केली आहे. आज ( सोमवारी ) भुरसे आपली पत्नी, मुलगा दिनेश याच्यासह शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास पाणी देत असताना तेजराव भुरसे यांच्या विद्युत तारेला स्पर्श झाला. वडिलांना विद्युत शॉक लागल्याचे बघून मुलगा त्यांना सोडविण्यासाठी धावून गेला. मात्र, त्यालाही शॉक लागला. पती व मुलाला विद्युत शॉक लागल्याचे असल्याचे बघून पत्नीने आरडाओरड केली. यावेळी जवळील शेतातील शेतकरी धावून आले. त्यांनी लगेच वीज पुरवठा खंडित केला.

कहरच! पत्नीसोबत रोमान्स करताना नियंत्रण सुटलं, असं घडलं की पतीने थेट गाठलं रुग्णालय…
पिता पुत्रांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तेजराव भुरसे यांना मृत घोषित केले. तर जखमी अवस्थेत दिनेशला प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली इथे हलविले गेले. तर या घटनेने सावली तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Ashadhi Ekadashi 2023: यंदाची आषाढी वारी जोरात, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here