म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: जगतात प्रचंड दहशत असलेल्या जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार प्रकाश बांदिवडेकर याच्याच घरात दोन चोरांनी डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या घरातील सोने,चांदी आणि रिव्हॉल्व्हरही पळवणाऱ्या अट्टल चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले, आणि या चोरांचे वेगळेच धाडस पुढे आले.

लॉकडाऊनच्या काळात शहर व परिसरात अनेक घरफोड्या होत आहेत. याला रोखण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची माहिती घेत असताना दोन गुन्हेगारावर पोलिसांनी पाळत ठेवली. तेव्हा प्रशांत करोशी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार चोरी करण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याचा मित्र अविनाश शिवाजी आडवकर याच्या मदतीने त्याने अनेक घरफोड्या केल्याची कबूली दिली. तपासात तो कोल्हापुरातील बँक फोडण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

वाचाः

पोलिसांनी त्याची कसून तपासणी केल्यानंतर त्याने शहरात अकरा घरफोडी, चोरी केल्याचे समोर आले. त्याच्याकडे चारचाकी, सोने, चांदी असा सत्तावीस लाखांचा मुद्देमाल आढळून आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहा.पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, संतोष पोवार, श्रीकांत मोहिते यांनी केली.

वाचाः

करवीर तालुक्यातील इस्पुर्ली या गावचा रहिवाशी असलेला करोशी हा पुण्यात राहत होता. साधारणता पाच ते सहा या दरम्यान तो कोल्हापुरात येत असे. एखाद्या भागात जाऊन बंद घरांचे तो मोबाईलवर फोटो काढायचा. त्यानंतर पुन्हा दहा ते साडे दहा या दरम्यान त्या घरासमोर जाऊन ज्या घरात लाईट लागली आहे, ते फोटो डिलीट करायचा. त्यानंतर पुन्हा रात्री बारा वाजता याच पद्धतीने फिरती करून माहिती घेऊन रात्री दोन वाजता बंद असलेल्या घरात तो चोरी करायचा. एक दिवस त्याने कुविख्यात गुन्हेगाराचेच घर फोडले. तेथून त्याने सोने, चांदीसह रिव्हॉल्व्हरही पळवले. पण गुन्हा नोंद होताना रिव्हॉल्व्हर चोरीचा उल्लेख टाळला गेला. आता तो सापडल्याने पोलिस ते कुठून आले, त्याची चोरीच्या मालात नोंद का केली नाही याचा शोध घेत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here