म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : प्रलंबित पाणीपट्टी भरण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या अभय योजनेला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाच वर्षांत पाणीपट्टी वेळेत न भरणाऱ्यांची किंवा ती चुकवणाऱ्या जलजोडणीधारकांची संख्या १ लाख ६५ हजार ३६१ असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. त्यामुळे अद्यापही पाणीपट्टी वेळेत न भरणाऱ्या मुंबईकरांची संख्या पूर्णपणे कमी झालेली नाही. या अभय योजनेमुळे मात्र कोट्यवधींची वसुली करण्यात पालिकेला यश आले आहे.पाण्याचे बिल एका महिन्यात अदा करणे बंधनकारक आहे. मात्र दिलेल्या मुदतीत बिल न भरल्यास देयकाच्या रकमेवर दर महिन्याला दोन टक्के आकारणी केली जाते. या अतिरिक्त आकारातून जल जोडणीधारकांना विशेष सवलत देण्यासाठी २०१९-२०पासून अभय योजना २०२०सुरू करण्यात आली. या योजनेला चांगला प्रतिसाद मुंबईकरांनी दिला असला तरी पाणीपट्टी वेळेत न भरणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी झालेली नाही.
मागील पाच वर्षांत १ लाख ६५ हजार ३६१ मुंबईकरांनी पाणीपट्टी वेळेत भरलेली नाही. २०१९-२०मध्ये २१ हजार ७१० जणांनी पाणीबिल वेळेत भरले नव्हते. तर २०२३-२४मध्ये हीच संख्या ९४१ आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अकरा महिने आहेत. त्यामुळे पाणीपट्टी वेळेत अदा न करणाऱ्यांची संख्या ही वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सुरुवातीला या योजनेला प्रतिसाद मिळत नव्हता.

मुंबईकरांना लाभ
करोनामुळे सर्वच स्तरातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे एकरकमी थकीत पाणीपट्टी भरणे अनेकांना शक्य होत नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे थकीत पाणीपट्टीचे एकरकमी भरण्याची अट शिथिल करण्यात आली होती. या संधीचा मुंबईकरांनी लाभ घेतला आहे.
पाणीपट्टी वेळेत न भरणाऱ्यांची संख्या
आर्थिक वर्ष
२०१९-२०: २१ हजार ७१०
२०२०-२१: ९२ हजार ४४०
२०२१-२२: ३५ हजार ३८
२०२२-२३: १५ हजार २३२
२०२३-२४ : ९४१