मुंबई : जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत असली तरी देशांतर्गत बाजारात त्याचा परिणाम झालेला नाही. वरच्या स्तरावरून झालेल्या विक्रीमुळे आज देशांतर्गत वायदे बाजारात भावात घसरण नोंदवण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून झालेल्या विक्रमी दरवाढीच्या काळात सर्वसामान्यांसाठी दरात होणारी घसरण काहीसा दिलासा देणारी आहे.

सोन्या-चांदीचा आजचा भाव…
देशांतर्गत फ्युचर्स मार्केट म्हणजेच MCX (मल्टी कमोडिटी एक्स्चेंज) वर सोन्याची किंमत १०० रुपयांनी स्वस्त झाली असून १० ग्रॅम सोन्याची किंमत ६०,९२८ रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही घसरणीसह व्यवहार होत असताना एमसीएक्सवर चांदीचा दर २३० रुपयांनी घसरून ७३,१७३ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

Economic Offenders: आर्थिक गुन्हेगारांची आता खैर नाही… सरकार जारी करणार ‘युनिक कोड’, यादीत २.५ लाख नावे
जागतिक बाजारातील विक्रीच्या सत्रामुळे देशांतर्गत बाजारात किमती घसरल्या आहेत. उल्लेखनीय आहे की गेल्या आठवड्यापासून मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण होत आहे. गुडरिटर्न्स वेबसाइटवर जारी केलेल्या दरांनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,६४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची किंमत
जागतिक बाजारातही सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली. कोमेक्सवर सोन्याची किंमत प्रति औंस $२०२० वर पोहोचली असताना चांदीचा भाव २४.१९ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. अमेरिकन डॉलरमधील मजबुती सराफा बाजारातील कमजोरीचे मुख्य कारण आहे. डॉलर निर्देशांक १०२.४ च्या जवळ व्यवहार करत आहे.

HDFC बँक-HDFC कंपनीचं विलीनीकरण, बदलणार अनेक नियम; FD ग्राहकांवर काय परिणाम होणार?
एका मिस्ड कॉलवर भाव तपासा
२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्ही एक मिस्ड कॉल देतुन त्याची किंमत जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही खरेदीला जाण्यापूर्वी ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात SMS द्वारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com या संकेतस्थळी भेट देऊ शकता.

WPI Inflation: सर्वसामान्यांना दुहेरी दिलासा; महागाईचा पारा घसरला, घाऊक महागाई तीन वर्षांच्या तळात
सोन्याचा हॉलमार्क
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क दिले जाते. २४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर ९९९, २३ कॅरेटवर ९५८, २२ कॅरेटवर ९१६ तर २१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० लिहिलेले असते. लक्षात घ्या की जितकं जास्त कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते. २४ कॅरेट सोने ९९.९%, तर २२ कॅरेट सोने जवळपास ९१% शुद्ध असते. २२ कॅरेट सोन्यात ९% इतर धातूंचे मिश्रण असते. आणि दागिने तयार करण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर होतो, ज्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. तर २४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध असले तरी त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here