कोल्हापूर : दारूच्या नशेत आधी पोटच्या मुलानेच वडिलांचा खून केला. त्यानंतर मुलानेही आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील देसाईवाडी येथे घडली आहे.मनोहर अप्पाजी गावडे असे ५८ वर्षीय मयत वडिलांचे नाव आहे, तर सागर मनोहर गावडे असे आत्महत्या केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

चंदगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावडे कुटुंबीय मूळचे जांबरे येथील असून चंदगड तालुक्यातील देसाईवाडी ते वास्तव्यास आहेत. मुलगा सागर याला दारूचे व्यसन असल्याने वडील मनोहर गावडे यांच्याशी त्याचा वारंवार वाद व्हायचा. आई मीनाक्षी यांनी वेळोवेळी मध्यस्थी केली, पिता-पुत्रांतील वाद मिटवण्याचा प्रयत्न त्या करत होत्या, मात्र सागर व्यसनाच्या अधीन गेल्याने घरामध्ये रोजच भांडणे होत होती.

Jalgaon Crime : तू काय माधुरी दीक्षित आहेस का? कपडे धुणाऱ्या महिलेचा विनयभंग, जळगावात दोघांना अटक
रविवारी चंदगड येथील गावडे यांचे पाहुणे सातवणेकर यांच्या घरी बारशाचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमाच्या वेळी सागर हा दारू पिऊन तिथे आला आणि त्यांनी आईलाच तुझ्या नवऱ्याला संपवतो अशी धमकी दिली आणि तो घरी आला. वडिलांशी वाद झाल्यानंतर सागरने चाकूने मनोहर गावडे यांच्या हातावर वार केला, आणि त्यांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.

स्थानिक पुढाऱ्यांना घाम फोडणाऱ्या नेत्याची पुण्यात गोळ्या घालून हत्या

दारूच्या व्यसनातून कुटुंब उद्ध्वस्त

मनोहर गावडे आणि सागर गावडे या दोघा बाप-लेकांना दारूचे व्यसन होते, या व्यसनातून दोघांच्यात वारंवार वाद होत होते. वाद विकोपाला गेल्याने अखेर वडिलांचा खून करून या वादाचा शेवट मुलगा सागर याने केल्याची चर्चा गावात सुरू आहे.

Pune News : मासेमारीसाठी पाण्यात करंट सोडणं अंगलट, पुण्यात मच्छिमाराचाच तडफडून मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here