पुणे : पुण्यातील बऱ्याचशा भागात बिबट्याचं दर्शन रोज होत आहे. मानवी वस्तीकडे बिबट्याचं प्रमाण जास्त वाढलेलं दिसत आहे. अशीच एक भयंकर घटना जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातून समोर आली आहे. आळेफाटा येथील नगर – कल्याण महामार्गावर असणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली बॉडी बिल्डर्स पत्रा शेडमध्ये असणाऱ्या पाळीव कुत्र्याची एका बिबट्याने शिकार केली आहे. एवढेच नाही तर कुत्रा आपला मालक झोपला असताना त्याच्या खाटेशेजारीच बसला होता. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून कुत्र्याला तोंडात धरून बिबट्या पसार झाला आहे. या घटनेत तरुण मात्र थोडक्यात बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. १४ मे रोजी रात्री साधारण सव्वा दोनच्या सुमारास आळेफाटा परिसरातील कल्याण रोडवर सुदामा मुन्निलाल शर्मा यांचे ज्ञानेश्वर माऊली बॉडी बिल्डर्स या नावाने रिपेअरिंगचे गॅरेज आहे. दिवसभरातील कामे आटोपून त्यांचा मुलगा सुधाकर आणि पाळीव कुत्रा नेहमीप्रमाणे पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. मध्यरात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास बिबट्या वाहनांच्या आडोशाने दबक्या पावलांनी आला.
चव्हाणांच्या नेतृत्वात मविआने मैदान मारलं; भाजपला अवघ्या ६ जागा, त्यातही दोन ईश्वरचिठ्ठीने
बिबट्याने अचानक कुत्र्यावर हल्ला केला. कुत्र्याचा आवाज आल्याने सुधाकरला जाग आली. सुधाकर याच्या डोळ्यादेखत बिबट्याने कुत्र्याची शिकार केली आणि शिकार तोंडात धरून बिबट्या घटनास्थळवरून पसार झाला. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यापूर्वीही अनेकदा बिबट्याने कुत्र्यांची शिकार केली असल्याची सुदामा शर्मा यांचे म्हणणे आहे. या परिसरात तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी शर्मा यांनी केली आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्याने कुत्र्याला आपले भक्ष्य बनवले. त्यामुळे शेजारी झोपलेला व्यक्ती थोडक्यात बचावला आहे.

तू ये तुला षटकारच मारतो! लहानपणीची मैत्री विसरला शुभमन गिल; हैदराबादच्या सामन्यात मित्रालाच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here