मुंबई : भांडणासाठी एक छोट कारणही पुरेसे आहे. राजकारणी असो, शिक्षण असो किंवा व्यवसाय, प्रत्येक क्षेत्र आपापल्या वाद आणि प्रतिस्पर्ध्याचे साक्षीदार राहिले आहेत. व्यवसाय क्षेत्रात टाटा, अंबानी, वाडिया ही देशातील काही प्रमुख नावांमध्ये गणली जातात. दिग्गज उद्योगपती धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा या मोठ्या दिग्गजांचा समावेश असलेल्या भारतीय व्यवसाय उद्योगातील स्पर्धाही मनोरंजक राहिली. आणि या दोघांविरुद्ध युद्ध छेडणारे म्हणजे बॉम्बे डाईंगचे अध्यक्ष नुस्ली वाडिया.नुस्ली वाडिया आणि टाटा यांच्यातील वाद अलीकडचा असला तरी अंबानी विरुद्ध वाडिया यांच्यातील वाद खूप जुना आहे. अशा स्थितीत आज आपण अंबानी आणि टाटांसोबत वाढत मुख्य व्यक्ती असलेल्या नुस्ली वाडिया यांच्याबाबत.

Nusli Wadia Vs Tata: रतन टाटांविरुद्ध युद्ध छेडलं, बालपणीच्या मित्राशी ‘पंगा’ घेणारा कॉर्पोरेट जगतातील समुराई
नुस्ली वाडिया
बेडशीट, टॉवेल इत्यादींसाठी बॉम्बे डाईंग हे नवीन प्रसिद्ध आहेत. अंबानीपूर्व काळात ही कंपनी कापड क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक होती. वाडिया कुटुंबाने गेल्या शतकभरासून अनेक व्यवसायात आपला पाय रुजवला आई. वाडिया विरुद्ध अंबानी कॉर्पोरेट लढाई तेव्हा सुरू झाली जेव्हा दोघे पॉलिस्टर उद्योगाच्या वाढीकडे वळले. १९७० च्या दशकात उदयाला आलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने अल्पावधीत यशाची शिखरे गाठली. तर १९८९ पर्यंत रिलायन्सचा एकूण टर्नओव्हर ३००० पोहोचला होता, तर बॉम्बे डाइंगशी त्यांची तुलना अशक्य होती कारण त्यावेळी त्यांचे एकूण भांडवल ३०० कोटी इतकेच होते.

यादरम्यान रिलायन्सने पॉलिमर क्षेत्रात एन्ट्री घेतली, जिथे बॉम्बे डाइंग निर्विवाद वर्चस्व गाजवत होती. इथूनही धीरूभाई अंबानी आणि नुस्ली वाडिया यांच्यात स्पर्धा सुरू झाली. अंबानींनी या लढाईत बाजी मारली कारण वाडिया यांच्या निवडीमुळे बॉम्बे डाइंग शर्यतीत मागे पडली. यामागचे कारण म्हणजे वाडिया यांनी डायमिथाइल टेरेफथॅलेट (डीएमटी) कापडाची निवड केली तर धीरूभाई अंबानी यांनी शुद्ध टेरेफथॅलिक ऍसिड (पीटीए) निवडले, जे गेमचेंजर ठरले.

रतन टाटा सांत्वनाला गेले अन् डेड बॉडीशी बोलून परत आले, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा
यानंतर २०१७ मध्ये धीरूभाई अंबानींच्या धाकटा मुलगा अनिल अंबानीला मागे टाकून नुस्ली वाडिया यांनी फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत मुसंडी मारली. वाडिया २५ व्या स्थानावर तर अनिल अंबानी ४५ व्या स्थानावर होते. मात्र, ज्या अंबानीं कधीकाळी बॉम्बे डाइंग बुडवली होती, त्याच अंबानींच्या मुलाला पछाडत पुन्हा एकदा बॉम्बे डाइंगचं नाणं खणखणीत वाजलं.

टाटांशीही घेतला पंगा
टाटा समूहाचे चेअरमन एमेरिटस रतन टाटा यांच्याशीही वाडिया यांचे मतभेद राहिले. विशेष म्हणजे दोघे बालपणीचे मित्र होते तर ते जेआरडी टाटांचा आपले गुरु मानायचे. इतकेच नाही तर जेआरडींनी वाडियांना बॉम्बे डाईंगचा ताबा घेण्यास मदत केली होती.

आयुष्यातले शेवटची वर्ष आरोग्य सेवेसाठी; रतन टाटांचं भावूक भाषण

जेआरडीने रतन टाटा यांच्याकडे जेव्हा कंपनीची सूत्रे सोपवली तेव्हा वाडिया यांनीच टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून सुरुवातीच्या काळात त्यांना मार्गदर्शन केले. नुस्ली वाडिया जवळपास एक दशकापर्यंत टाटा केमिकल्स, टाटा स्टील आणि टाटा मोटर्सचे स्वतंत्र अध्यक्ष होते. मात्र, सायरस मिस्त्री आणि रतन ताटांमधील वादात मिस्त्री यांची बाजू घेतल्यामुळे वाडिया टाटा सन्समधील पदावरून पायउतार झाले. टाटा मोटर्समधून बाहेरचा रस्ता दाखवल्यावर त्यांनी रतन तटांवर मानहानीचा खटला दाखल केला होता, जो त्यांनी २०२० मागे घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here