रत्नागिरी: मंडणगड तालुक्यातील लाटवण आदीवासीवाडी येथील आदिवासी समाजबांधवांची कुटुंबं पाली येथे देव दर्शनाकरिता गेले होते. यावेळी ते परत येत असताना त्यांच्यातील एक झायलो प्रवासी गाडी झाडावर आदळून मोठा अपघात झाला. महाड तालुक्यातील कोंड मालुसरे या ठिकाणी गंभीर अपघात झाला. या अपघातात ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताने घोगरेकर, जगताप आणि पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. दोन गाड्या करून ही कुटुंब पाली येथे गेली होती. त्यातील एका गाडीला हा मोठा अपघात झाला आहे.लाटवण आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजबांधवांची कुटुंबे १४ मे रोजी देवदर्शनासाठी गेली होती. त्यावेळी रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील कोंड मालुसरे गावानजीक मोठा अपघात झाला. या अपघातात लक्ष्मी धाकट्या घोगरेकर (वय ७५, रा. लाटवण आदीवासीवाडी) यांचे घटनास्थळीच निधन झाले.

लव्ह मॅरेजनंतर पतीचा हार्ट अटॅकने अंत, अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच पत्नीचं टोकाचं पाऊल
तर गाडीतील अनिता संतोष घोगरेकर (वय ४०), अर्चना गोपाल जगताप (वय २६), सुमीत संतोष घोगरेकर (वय १४), पूर्वा संतोष घोगरेकर (वय १२ ), सुमेध संदीप घोगरेकर (वय १.५ वर्ष), संतोष धाकट्या घोगरेकर (वय ४०) सर्व राहणार लाटवण आदिवासी वाडी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर वनिता संतोष घोगरेकर (वय ४०), सुरज गणेश पवार (वय २५) आर्यन संदीप घोगरेकर (वय १५) सर्व राहणार लाटवण आदिवासीवाडी यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेसंदर्भात मंगला गणेश पवार (वय ३५, रा. आदीवासीवाडी लाटवण, तालुका मंडणगड) यांनी दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने नातेवाईक आणि पाहुणेमंडळी सुट्टीसाठी गावी आलेली होती.

तिसऱ्या बायकोला पोरगा नको, पतीला अट घातली अन् अनर्थ घडला, ७ वर्षाच्या चिमुकल्यासोबत भयंकर घडलं
घरातील सर्व नातलग, मुलेबाळे आणि वाडीवर राहत असलेली भावांची कुटुंबे एर्टिगा आणि झायलो या दोन गाड्यांमधून देवदर्शनाकरिता रायगड जिल्ह्यातील पाली येथे गेले होते. देवदर्शनाचा कार्यक्रम आटपून सर्वजण रात्री घराकडे परतत असताना घरापासून काही मीटर अंतरावरती असतानाच झायलो गाडीच्या चालकाचा गाडीवरुन ताबा सुटून गाडी रस्त्याशेजारी असलेल्या झाडावर आदळली आणि मोठा अपघात झाला. अशी माहिती फिर्यादीत नमूद केली आहे.

अपघातातील जखमींवर मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन त्यांना पुढील उपचाराकरिता डेरवण येथे पाठविण्यात आले आणि डेरवण येथूनही पुढील उपचाराकरिता मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. मंडणगड पोलीस स्थानकात या घटनेसंदर्भात जबाब दाखल करण्यात आला असून या अपघाताची नोंद महाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

एसटी चालकाचा महामार्गावर अंदाज चुकला अन् बस थेट रस्ते दुभाजकावर चढली; ४७ प्रवासी थोडक्यात बचावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here