चंद्रपूर : देशसेवेसाठी पुलवामा येथे कार्यरत असलेल्या जवानाचा हृदयविकाराचा धक्क्याने दुदैवी मृत्यू झाला. वैभव दशरथ वाघमारे असे मृत जवानाचे नाव आहे. कौटुंबिक कामानिमित्ताने सहा दिवसापूर्वी तो चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी येथील घरी आला होता. मात्र त्यांच्या अकस्मात मृत्यूची बातमी कळताच जिल्हात शोककळा पसरली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येणाऱ्या पांढरवानी येथील वैभव वाघमारे हा सीआरपीएफमध्ये देशसेवेसाठी पुलवामा येथे कार्यरत होता. घरगुती कामासाठी मागील सहा दिवसांपूर्वी तो स्वगावी पांढरवानी येथे आला होता.

सोमवारी अचानक त्याला प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. कुटुंबीयांनी तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र तिथेच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पदरात पाच महिन्यांची लेक, निवृत्त पोलिसाच्या सुनेचा गूढ मृत्यू, माहेरच्या मंडळींना संशय
वैभव हा विवाहित आहे. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटूंबाला मोठा हादरा बसला आहे. देशासाठी दिवसरात्र जागणाऱ्या जवानाचे अशा अवेळी जाण्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

‘वीर जवान मयूर यादव अमर रहे’च्या घोषणा देत शहीद जवानाला अखेरचा निरोप

दोन्ही भाऊ देशसेवेत

मृतक वैभव वाघमारे याचा लहान भाऊ विशाल वाघमारे हा बीएसएफ जवान आहे. तो बांगलादेश सीमेवर कार्यरत आहे. दोघांनाही आधीपासूनच देशसेवेची आवड होती. मोठ्या परिश्रमाने दोघांनी सैन्यात प्रवेश केला होता. मात्र मोठ्या भावाचा अवेळी जाण्याने लहान भाऊ व्यथित झाला आहे.

Pune News : मासेमारीसाठी पाण्यात करंट सोडणं अंगलट, पुण्यात मच्छिमाराचाच तडफडून मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here