मुंबई : नफेखोरांमुळे मोठी पडझड अनुभवलेल्या सोने आणि चांदीने पुन्हा एकदा तेजीची वाट धरली आहे. गुरुवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली. त्याचबरोबर जागतिक बाजारात देखील सोन्याच्या किमती २.५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या भावात गेले काही दिवस सातत्याने वाढ होत असतानाच बुधवारी अनपेक्षितरीत्या या दोन्ही धातूंचे भाव गडगडले होते. शुक्रवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसात सोने प्रति १० ग्रॅमला पाच हजार रुपयांनी कोसळले होते तर चांदीच्या दरात ८ त १० हजारांची घट झाली होती.

मात्र गुरुवारी हे मौल्यवान धातू पुन्हा एकदा तेजीने झळाळून निघाले. सकाळच्या सत्रात सोने ५१८०२ रुपयांच्या नीचांकी स्तरावर होते. ते संध्याकाळी बाजार बंद होताना ५२८२३ रुपयांपर्यंत वाढले. सोन्यात काल ५६९ रुपयांची वाढ झाली. चांदीच्या किमतीत देखील गुरुवारी मोठी वृद्धी झाली. चांदीचा भाव एक किलोला ३९३७ रुपयांनी वधारला आणि तो ७०७९० रुपये झाला.

goodreturns या वेबसाईटनुसार शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव १५० रुपयांनी कमी होऊन ५१२५० रुपये झाला आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२२५० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोने ५११५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५५९०० आहे. दिल्लीत सोने १४०० रुपयांनी महागले आहे. कोलकात्यात देखील सोन्याचं दरात १०१० रुपयांची वाढ झाली आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५१७७० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५४४६० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५१०५० रुपये असून त्यात ९२० रुपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेटसाठी ५५५०० रुपये भाव असून त्यात ८२० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्यावर घडणावळ आणि जीएसटी आकारला जातो.

करोना संकटावर उपाययोजना म्हणून अमेरिकेकडून लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर केले जाणार आहे. त्याशिवाय करोना रुग्णांची वाढती संख्या त्यावरील लशीचे संशोधन याचे पडसाद बाजारावर उमटत आहेत. त्यामुळे कमॉडिटी बाजारावरील दबाव वाढला आहे.

स्पॉट गोल्डच्या किमतीत गुरुवारी १.८ ते २.५ टक्क्याची वाढ झाली आणि सोन्याचा भाव प्रती औंस १९४५.२७ डाॅलरवर गेला. मंगळवारी सोन्याचा भाव प्रती औंस १९४१.७१ डॉलर इतका कमी झाला होता. सोमवारी तो २०२१.३२ डॉलर होता. चांदीच्या दर प्रती औंस भाव २५ डॉलरच्या आसपास आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here