रायपूर: छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यात बनगौरा गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीनं स्वत:च्या दोन भावांची हत्या केली आहे. यासोबतच भावजी आणि मोठ्या भावावरदेखील जीवघेणा हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. पोलिसांनी आरोपी सुख सिंह बैगाला (४६) अटक केली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. घरात सोहळा सुरू असताना सुख सिंहची पत्नी विवाह मंडपात तिच्या दिरासोबत आणि अन्य नातेवाईकांसोबत नाचत होती. ते पाहून सुख सिंह संतापला. दारुच्या नशेत त्यानं धारदार शस्त्रांनी पत्नीवर वार केले. या दरम्यान त्याचे लहान भाऊ मध्ये आले. त्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीनं दोन्ही भावांवर हल्ला करुन त्यांचा जीव घेतला. दोन भावांचा जीव घेऊनही सुख सिंह शांत बसला नाही. वाद मिटवण्यासाठी आलेल्या भावजी आणि मोठ्या भावावरदेखील त्यानं हल्ला चढवला. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांची प्रकृती नाजूक आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. लग्न सोहळ्यात एका व्यक्तीनं त्याच्या दोन भावांची हत्या केली. त्याच्या हल्ल्यात त्याचे भावजी आणि मोठा भाऊ गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक लालउमेंद सिंह यांनी दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here