मलेशिया: लहान मुलं खूप खोडकर असतात, त्यांची ही सवय अनेकदा आपल्याला गोंडस वाटते तर कधी त्यांचा हा खोडकरपणा खूप महागातही पडू शकतो. आजच्या मुलांचा बहुतांश वेळ मोबाईलवर जातो. त्यामुळे त्यांचा खोडकरपणाही आता डिजिटल झाला आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. अनेकदा अशी प्रकरणं समोर येत असतात ज्यामध्ये हे लहान मुलं ऑनलाईन गेम खेळताना लाखो रुपये गमावतात. पण, आता एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये एका लहान मुलाने असं काही केलं आहे की कोणाच्याही अंगावर काटा येईल.ही घटना मलेशियातून उघडकीस आली आहे. येथे राहणाऱ्या एक सहा वर्षाच्या मुलाने वडिलांची चारचाकी गाडी रस्त्यावर चालवली. यादरम्यान त्याने त्याच्या तीन वर्षांच्या भावालाही सोबत घेतलं होतं. हे वाचून कोणालाही धक्का बसेल.

Crime News: पत्नी, काकू, वहिनी आणि माहेरी आलेल्या बहिणीला संपवलं, घटनेने सारं गाव दहशतीत
धक्कादायक म्हणजे, हा मुलगा यूट्यूबवरून कार चालवायला शिकला होता. अनेक दिवस युट्युबवर कार चालवतानाचे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने थेट वडिलांची खरीखुरी गाडी चालवली. या मुलांने गाडी तब्बल अडीच किलोमीटर चालवली आणि नंतर ही लॅम्प पोस्टवर धडकली. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात दोन्ही मुले सुखरूप बचावली.

लव्ह मॅरेजनंतर पतीचा हार्ट अटॅकने अंत, अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच पत्नीचं टोकाचं पाऊल
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना अनेक माहिती मिळाली. तसेच, पोलिसांनी हे निश्चित केले की खरंच हा मुलगा नेहमी कार ड्रायव्हिंगचे व्हिडिओ पाहत असे. याशिवाय, तो वडिलांनाही कार चालवताना पाहत असत. मुलाला याबद्दल विचारले असता तो जरा घाबरला, पण अखेर त्याने गाडी चालवायला कशी शिकली हे सांगितलं. तंत्रज्ञानामुळे लोकांचे जीवन सुकर होते पण त्याचबरोबर अनेक अडचणीही निर्माण होतात. ही घटना त्याचे जिवंत उदाहरण आहे.

बुलढाण्यात अज्ञातांनी क्षणार्धात पेटवली सनरूफ कार, सीसीटीव्ही’मध्ये कैद झाला थरार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here