नवी दिल्ली : दिल्लीतील शाहदरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ४५ वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि ६ वर्षांच्या मुलीची हत्या केली आणि मुलगा युवराजवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा बचावला असून त्याला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हत्येनंतर या व्यक्तीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तिघांचा एकत्र मृत्यू झाल्याच्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. ही व्यक्ती दिल्ली मेट्रोमध्ये काम करत होती. त्याने हे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून तपासात काही धक्कादायक बाबीही समोर आल्या आहेत.Sex racket in Pune: पुण्यात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; भोजपुरी अभिनेत्री, मॉडेलला पकडले
या व्यक्तीने फाशी कशी घ्यायची याची माहितीचा कम्प्युटरवर शोध घेतला होता असेही तपासात समोर आले आहे. डीसीपी शाहदरा रोहित मीना यांनी मंगळवारी सांगितले की, सुशील असे या व्यक्तीचे नाव असून तो विनोद नगर येथील डीएमआरसी डेपोमध्ये पर्यवेक्षक होता. पत्नी अनुराधा, मुलगी आदिती आणि मुलगा युवराज यांच्यावर त्याने चाकूने हल्ला केला. यानंतर त्याने गळफास लावून घेतला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे, तर मुलगा युवराजवर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नांदेडमध्ये उष्मघाताचा पहिला बळी, २८ वर्षीय युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, हृदयविकाराचा झटकाही आला
या घटनेनंतर सुशीलला त्याच्या मित्राचा फोन आला होता. तू ड्युटीवर का आला नाहीस, अशी त्याने विचारणा केली. त्यानंतर त्याने कुटुंबाची हत्या केली आणि आता आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्या मित्राने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

दुपारी बाराच्या सुमारास दिल्ली पोलिसांना पीसीआर कॉल आला. घटनास्थळी दाखल झालेले पोलीस अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिस रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचीही चौकशी करत आहेत. शाहदरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांना सुसाईड नोटही मिळाली आहे.

बेळगावात राजकीय राडा; महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सुधा भातकांडेंच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here