मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचा जोर आता कमी झाला असून उन्हाचा तडाखा वाढत असल्याचं चित्र आहे. अशात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा वाढतच असून ४० अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. या सगळ्यात १७ मे पासून राज्यात आणखी उष्णता वाढेल असा इशारा हवामान खात्याकडून करण्यात आला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मोचा चक्रीवादळाचा परिणाम अद्यापही देशभरात पाहायला मिळत आहे. यामुळे मुंबईसह कोकणात उकाडा वाढला असून राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही सूर्य आग ओकत असल्याचं चित्र आहे. अशात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अतिउष्षतेमुळे एखादी अवकाळी पावसाची सर बरसू शकते अशीही शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Pune Video: कारवाईसाठी अधिकारी येताच फेरीवाल्यांकडून जीवघेणा हल्ला, धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद
रविवारी मोचा चक्रीवादळ म्यानमारच्या उत्तर-पश्चिमी किनाऱ्यावर धडकलं. यामुळे पुढे मान्सूनच्या वाटेतही अडथळा निर्माण होऊन मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण यामुळे १७ तारखेपासून म्हणजेच उद्यापासून राज्यात पुन्हा एकदा उष्णतेचा पारा वाढणार आहे. यामुळे हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना हिटवेव्हचा अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १५ मे पासूनच राज्यात कडक उन्हाळा पाहायला मिळेल. यानुसार मुंबईसह अनेक उपनगरं आणि इतर जिल्ह्यांमध्ये घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे शक्य असल्यास दिवसा घराबाहेर पडणं टाळा, वारंवार पाणी प्या, सावळीचा आसरा घ्या अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

Heat Stroke : उष्माघाताची रुग्णसंख्या यंदा दुप्पट, गर्भवतीचा बळी; वाढत्या उन्हात कशी काळजी घ्याल?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here