छत्रपती संभाजीनगर : ई शिवाई बस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. ई शिवाईची गेल्या काही दिवसांपासून सर्वांना प्रतीक्ष होती. आता ही बस पुणे ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर धावणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही ई शिवाई बस १८ तारखेपासून सेवेत दाखल होणार आहे. यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. जवळपास सहा तासांचा हा प्रवास आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या ताफ्यात ही ई शिवाई दाखल झाली आहे. ही नवी कोरी बस छत्रपती संभाजी नगर शहरातील बस स्थानकामध्ये दाखल करण्यात आली. ही बस येत्या १८ तारखेपासून म्हणजेच गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. या बससाठी शिवनेरी बस प्रमाणेच भाडे असणार आहेत. शिवनेरी बसचे पुण्याचे भाडे ५१५ रुपये आहे. नव्या ई शिवाई बससाठी दहापेक्षा जास्त फेऱ्या ठेवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

चार्जिग…..

डीसी चार्जर – २ तास
एसी चार्जर – ४ तास
एका चार्जमध्ये – ३०० किलोमीटर धावते
बॅटरी – १८० केव्ही.

ई शिवाई बसमध्ये या आहेत सुविधा…

> अनाउन्समेंट सिस्टिम (चालकासमोर माईक)
> सात सीसीटीव्ही
> प्रवाशांचे सामान ठेवायला जागा
> प्रशस्त आसनव्यवस्था
> पॅनिक बटण सुविधा
> फूट लॅम्प
> प्रत्येक आसनाजवळ रीडिंग लाइट
> पावरफुल एसी
> प्रवाशांकरिता गाडीमध्ये टीव्ही
> थांब्याची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रिक लाइट फलक
> ऐसी, चार्जिंग, रीडिंग लंप, एलईडी

E Shivneri Bus : ई-शिवनेरीला पहिल्याच फेरीत प्रवाशांचा उदंड प्रतिसाद, पण महिलांसाठी महागडा प्रवास!
बसची वेळ काय असेल?

छत्रपती संभाजीनगर शहरातील एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये ई शिवाई बस दाखल झाली आहे. ही शिवाई बस १८ तारखेपासून प्रवाशांना प्रवासासाठी उपलब्ध असणार आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांसह ही बस सुसज्ज आहे. यामुळे या बसचा लाभ प्रवाशांना नक्कीच मिळेल, अशी माहिती विभाग नियंत्रक सचिन शिरसागर यांनी दिली. सध्या बसची वेळ निश्चित करण्यात आलेली नाही. वेळ निश्चित केलेल्या त्याची माहिती देण्यात येईल. तरीही अदाजे संभाजीनगरहून पुण्यासाठी सुटणारी बस ही सकाळी पहाटे ५ ते सकाळी ९ वाजताच्या दरम्यान असेल, असं विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

गुड न्यूज! ई-शिवनेरी बस सुरू, तिकीट दर कायम, जाणून घ्या कुठून कुठे धावणार अन् काय आहे खासियत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here