नेमकं काय आहे प्रकरण?
ठाणे देहाट परिसरात राहणारे विजय प्रजापती यांच्या मुलीचं २१ मे रोजी लग्न होणार होतं. यासाठी १६ तारखेला घरामध्ये लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. घरातील सगळेजण उत्साहात आणि आनंदात लग्नाची तयारी करत होते. अशात एका माथेफिरू तरुणाने मुलीच्या घरात घुसून तिची चक्क गोळ्या झाडून हत्या केली. यावरच तो थांबला नाहीतर त्याने लगेच शेजारच्या घरात जाऊन गळफास घेत आपलंही आयुष्य संपवलं.
दरम्यान, मुलीची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर घरात एकच खळबळ उडाली आणि कुटुंबियांनी मोठी आरडाओरड सुरू केली. अशात आरोपी तरुणाने शेजारचं घर गाठलं. सगळेजण ओरडत असल्याचं पाहताच त्याने गळफास घेत आत्महत्या केली. घरातील लोक जेव्हा आरोपीला शोधण्यासाठी शिरले तेव्हा त्यांनी लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पाहिला. तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि पुढील तपास सुरू झाला.
या प्रकरणामध्ये आरोपी हा मृत तरुणीचा प्रियकर असल्याची चर्चा गावात सुरू आहे. तर पोलीस सध्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांची चौकशी करत असल्याची माहिती आहे.