जयपूर: कर्नाटकातील एकहाती विजयानंतर काँग्रेसपुढे सर्वात मोठे आव्हान मुख्यमंत्री निवडीचे आहे. डी. के शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोन मात्तबर नेत्यांपैकी हायकमांड कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकणार याची संपूर्ण देशभरात चर्चा आहे. काँग्रेससाठी एकीकडे आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे चिंतेची बाब समोर आली आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान या राज्यात मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटल्याचं वृत्त आहे.

पायलट यांनी आपल्याच सरकारविरोधात मोर्चा उघडला असून त्यांनी थेट रस्त्यावर उतरत जनसंघर्ष यात्रेला सुरवात करत बंडाचं निशाण फडकावलं आहे. तसेच या यात्रेच्या निम्मिताने आपला इरादा पायलट यांनी स्पष्ट केला आहे. मात्र, तरीही काँग्रेस हायकमांडने पायलट प्रकरणावर शांत राहणे पसंत केल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कर्नाटक मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयानंतरच राजस्थानचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

१६ आमदारांचा निर्णय कधी आणि कसा घेणार? राहुल नार्वेकरांनी ‘प्रोसेस’ सांगितली!
उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावरील बंडखोरीच्या आरोपांना मुख्यमंत्री अधिक गेहलोत मोठ्या प्रमाणात हवा देतायत. यादरम्यान, सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांच्या गटावरती टीका करण्याची एकही संधी गेहलोत सोडत नाहीयेत. अशातच सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपकडून करोडो रुपये घेतल्याचा आरोप गेहलोत यांनी केला. त्यामुळे राजस्थानातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या आरोपानंतर सचिन पायलट यांनी पक्षाला अंधारात ठेवत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी गेहलोत यांच्यावर तोफ डागली. गेहलोत यांच्या नेत्या सोनिया गांधी नसून वसुंधरा राजे आहेत, असा गंभीर आरोप पायलट यांनी केला. या पत्रकार परिषदेतच त्यांनी जनसंघर्ष यात्रेची घोषणा करून टाकली. तसेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात त्यांनी उपोषण देखील केले. मात्र, कर्नाटक राज्याची निवडणूक असल्याने तसेच पक्षातील संघर्ष देशपातळीवर आल्याने कर्नाटक निवडणुकीवर त्याचा प्रभाव पडेल, या कारणामुळे काँग्रेस नेतृत्वाने शांत राहणे पसंत केले.

पक्षातले कट्टर विरोधक, पण राज ठाकरेंच्या एका फोटोने आणि धमकीने सगळे वाद झटक्यात दूर…!
पण,आता कर्नाटक मुख्यमंत्री निवडीनंतर सचिन पायलट यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांना नोटीस दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राजस्थानातील सध्याची स्थिती काय?

काँग्रेसने अशोक गेहलोत यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेहलोत यांनी आपल्या समर्थक आमदारांच्या माध्यमातून पक्षावर दबाव निर्माण केला होता हे संपूर्ण देशाने पाहिले. राज्यातील सत्ता राखायची असेल तर गेहलोतांशिवाय सध्यातरी पक्षापुढे पर्याय नाही हे काँग्रेस नेतृत्वाला उमगल्यानेच गेहलोत यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. गेहलोतांच्या या खेळीने सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या महत्वकांक्षेला पुन्हा एकदा ब्रेक लागला.

ज्याने भाजपला सत्तेवर बसवलं, त्यानेच हादरा दिला, काँग्रेसच्या विजयामागचा खरा चेहरा!
आतादेखील, गेहलोतांनी आपल्या खेळीने पायलट यांना अडकवल्याची चर्चा आहे. भाजपकडून करोडो रुपये घेतल्याचा आरोप केल्याने सचिन पायलट यांनी संतापाच्या भरात आपल्याच सरकारविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वाच्या माध्यमातून पायलट यांना बाजूला केले जाऊ शकते असे बोलले जात आहे.

पायलट पक्ष सोडणार, वेगळी वाट निवडणार?

पायलट यांनी काँग्रेसला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यासंदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास मोठं आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच ते लवकरच नवीन पक्ष स्थापन करून भाजपच्या मदतीने पुन्हा सत्तेवर येतील अशा देखील जोरदार चर्चा होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here