नागपूर : शहरातील देहविक्रयासाठी कुप्रसिद्ध वस्ती असलेल्या गंगा जमुना येथे गुन्हे शाखेसह पोलिसांनी छापा टाकून देहविक्रयासाठी आणलेल्या मुलींची मोठ्या प्रमाणात सुटका करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान ८ ते ९ ग्राहकांनाही पकडण्यात आले आहे. बंदी असतानाही गंगा जमुना परिसरामध्ये अल्पवयीन मुली वेश्याव्यवसायात व्यस्त असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर हा संपूर्ण छापा टाकण्यात आला.गंगामजमुनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वेश्या व्यवसाय सुरू आहे. गंगाजमुनामध्ये सुमारे ३ ते ४ हजार मुली व महिला देहविक्रयात गुंतलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून गंगा जमुनामध्ये अल्पवयीन मुलींना देहविक्रय करण्यासाठी भाग पाडले जात असल्याची तक्रार वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, गंगा जमुनामध्ये या दलालांचे लकडगंज पोलिस स्टेशनचे डीबी पथक आणि गुन्हे शाखेच्या काही कर्मचाऱ्यांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध आहेत असा आरोप करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यात शोककळा! जवानाला आसाममध्ये वीरमरण, कुटुंबीयांची ती भेट ठरली अखेरची
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वीच नागपूरची बदनाम वस्ती असलेल्या गंगा जमुना येथे देहविक्रयावर बंदी घातली असून त्यासाठी संपूर्ण कॅम्पसमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असे असतानाही परिसरामधील अनेक खोल्यांमध्ये छुप्या पद्धतीने देहविक्रय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परिसरामधील अनेक कुंटणखान्यांमध्ये अल्पवयीन मुलींना देहविक्रय करण्यासाठी भाग पाडले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

जीन्स, स्कर्ट-टॉप आणि शॉर्ट्स घालून मंदिरात प्रवेश नाही, पाहा कोणत्या मंदिराने काढले फर्मान
गुप्त तळघरात लपलेले होते

या माहितीवरून मंगळवारी गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक आणि लकडगंज पोलिसांनी संयुक्तपणे संपूर्ण कॉम्प्लेक्सची तपासणी केली, त्यादरम्यान संपूर्ण कॉम्प्लेक्समधून सुमारे ३० तरुणींची सुटका करण्यात आली. या गुरिल्ला ऑपरेशन दरम्यान, अनेक तरुणींना गुप्त तळघरांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. या मुलींचीही पोलिसांनी कुलूप तोडून सुटका केली. या कारवाईदरम्यान ८ ते ९ ग्राहकांनाही पोलिसांनी पकडले. मात्र, यामध्ये किती मुली अल्पवयीन आहेत, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या या अचानक कारवाईनंतर संपूर्ण गंगा जमुना परिसरात काही काळ घबराट पसरली होती.
दिल्ली हादरली! त्याने स्वत:सह कुटुंबाला संपविले, धक्कादायक घटनेने पोलीसही चक्रावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here