मुंबई: ब्रिटनची अॅम्ब्युलन्स ही ठाकरे सरकारची देण असल्याचं सांगून त्याचं क्रेडिट घेणाऱ्या नगरसेवकाला ट्रोलरने चांगलंच फैलावर घेतलं आहे. ही अॅम्ब्युलन्स सेवा महाराष्ट्र सरकारने ब्रिटनमध्ये लॉन्च केलीय का?, असा खोचक सवाल नेटकऱ्यांनी शिवसेना नगरसेवकाला विचारला आहे.

शिवसेनेचे अमेय घोले यांनी या ब्रिटनच्या अॅम्ब्युलन्सचा फोटो ट्विट करून त्यावर पोस्ट लिहिली आहे. मांडवा जेट्टी ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत मरीन अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारचा अनोखा आणि स्त्युत्य उपक्रम. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आभार, असं घोले यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. शिवसेनेच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही महाराष्ट्र सरकारचा चांगला उपक्रम असं ट्विट करत घोले यांचं ट्विट रिट्विट केलं होतं.

त्यावरून नेटकऱ्यांनी घोले आणि चतुर्वेदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. या अॅम्ब्युलन्सचा फोटो ब्रिटनचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही मरीन सेवा ब्रिटनमध्ये लॉन्च केलीय का?, असा खोचक सवाल नेटकऱ्यांनी या दोघांना विचारला आहे.

काय आहे सत्य?

खरे तर या फोटोचा महाराष्ट्राशी काहीही संबंधित नाही. हा फोटो एका ब्रिटिश आयलँड गव्हर्न्सची आहे. फ्लाइंग क्रिस्टिन असं या बोटीचं- III नाव आहे. घोले यांनी ट्विट केलेल्या या फोटोचा २०१४मध्ये बीबीसीच्या एका आर्टिकलमध्ये वापर करण्यात आला होता. त्यामुळे या फोटोचा महाराष्ट्राशी काहीच संबंध नसल्याचं सिद्ध होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here