कोल्हापूर: करणी केल्याच्या संशयावरून मंगळवारी रात्री घरात जेवत असलेल्या कुटुंबावर छोट्या तलवारीने सपासप वार करून सेंट्रिंग कामगाराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आझाद मुकबुल मुलतानी (वय वर्ष ४८) असे मृताचे नाव असून त्याच्यावर होणारे वार अडविण्यासाठी गेलेली सून अफसाना असिफ मुलतानी (वय वर्ष २२) ही देखील गंभीर जखमी झाली आहे. तर दोघांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.ही घटना टेंबालाई उड्डाण पुलाशेजारील बीएसएनएल टॉवर समोर असलेल्या झोपडपट्टीत घडला असून खून त्यांच्या शेजारीच राहणारा संशयित निखिल निखिल गवळी (वय वर्ष २२) यांनी केलं असल्याची कबुली स्वतःहून राजारामपुरी पोलिस ठाण्यात हजर होऊन केली आहे. तर हा खून करणी करीत असल्याच्या संशयावरून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. निखिल गवळी हा टेम्पो चालक असून दोघे ही एकाच परिसरातील रहिवासी आहेत.

या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापुरातील टेंबलाई उड्डाण पुलाशेजारील बीएसएनएल टॉवरसमोर मोठी झोपडपट्टी आहे. येथेच एका बोळात निखिल गवळी आणि मुतलानी कुटुंबे राहतात. मुलतानी हे सेंट्रिंगचं काम करतात. त्यांच्या घराशेजारी राहणारा निखिल गवळी हा तरुण टेम्पोचालक आहे. त्याला दारु आणि अमली पदार्थाचे व्यसन आहे. व्यसनाधिन निखिल गवळी हा चौकात राहणार्‍या नागरिकांना शिवीगाळ करणे, अंगावर धाऊन जाणे असे प्रकार करत असतो. त्याच्या या वागणूकीने नागरिक त्रस्त झाले होते.

६ वर्षांच्या पोराने युट्युबवरुन ड्रायव्हिंगचे धडे घेतले, बाबांच्या गाडीत लहान भावाला घेतलं अन्…
रात्री साडेआठच्या सुमारास निखिल घरी आला. तेव्हा बोळातील सर्व घरांचे दरवाजे बंद होते. त्याने दारूचे सेवन केल्याने नशेत होता. तो घरी गेला, दरम्यान शेजारी मुलतानी यांच्या घराचा दरवाजा उघडा होता आणि बाहेरच्या खोलीत आझाद, त्यांची पत्नी रेहाना, सून आयेशा, अफसाना आणि एक लहान मुलगा असे एकत्रित जेवायला बसले होते.

यावेळी अचानक निखिल छोटी तलवार घेवून त्यांच्या घरात घुसला. आझाद यांच्यावर वार केला. पहिलाच वार त्यांच्या मानेवर लागला. इतक्यात आझाद यांच्यासमोर जेवायला बसलेली सून अफसाना यांनी निखिलच्या अंगावर धाव घेवून वार अडविण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यामध्ये तीही जखमी झाली. एवढ्यात निखिलने आझाद मुलतानी यांच्यावर सात-आठ वार केले. इतक्यात कुटुंबीयांनी आरडाओरडा केली आणि आवाजाने आजूबाजूचे तेथे धावून आले. त्यावेळी निखिल तलवार घेवून तेथून निघून गेला. घरात सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता जेवणाची ताट अस्ताव्यस्त पडली होती. दरम्यान, थोड्याच वेळात आझाद यांचे नातेवाईक-भाचे तेथे आले आणि दोघांना रिक्षातून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, आझाद यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले.

मुलाबाळांसह तीन कुटुंब देवदर्शनावरुन परतत होती, घरापासून काहीच अंतरावर काळ आडवा आला अन्…
दरम्यान, सीपीआर पोलिस चौकीतील कॉन्स्टेबल हेगडे-पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. याचवेळी आझाद यांचा कामावर गेलेला मुलगा तौसिफ मुलतानी सीपीआरमध्ये दाखल झाला आणि शेजारी राहणाऱ्या निखीलनेच खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह शाहूपुरी पोलिस ठाण्यातील अधिकारी तेथे हजर झाले. याच दरम्यान खून केलेला निखिल थेट पोलिस ठाण्यात हजर झाला आणि शेजारील आझाद मुलतानी करणी करीत असल्यामुळे त्यांचा खून केल्याची कबुली त्यांनी पोलीसांना दिली.

दरवाजा बंद करून पंचनामा

दरम्यान, खून झाल्यानंतर घरात सगळीकडे रक्ताचा सडा पडला. होता जेवणाची ताटे अस्ताव्यस्त पडली होती. छोट्या खोलीमुळे पंचनामा करणेही पोलिसांसाठी कठीण झाले होते. परिसरात बघ्यांची गर्दी होऊ नये, म्हणून पोलिसांनी दरवाजा बंद करून पंचनामा केला. रात्रभर परिसरात तणाव होता. दरम्यान, पोलिसांनी हल्यामागील अन्य कारण काय आहे, याचाही तपास सुरू केला आहे.

मित्र-मैत्रिण फिरण्यासाठी गेले, रस्त्यातच नराधमांनी अडवलं, एकाने छेड काढली, दुसऱ्याने गोळी घातली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here