लखनऊ: एकुलत्या एका मुलानं आई, वडिलांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. २२ वर्षांच्या आर्यननं मित्राच्या मदतीनं आधी वडिलांना संपवलं. त्यानंतर त्यानं आईचा जीव घेतला. घरात सतत आई-वडिलांचे वाद व्हायचे. त्यामुळे घरातलं वातावरण बिघडलं होतं. कुटुंबातील भांडणांना कंटाळून मुलानं वडिलांच्या हत्येचा कट रचला. मेरठमधील नौचंदीमधील शास्त्रीनगरात ही घटना घडली.आर्यनच्या वडिलांना दारुचं व्यसन होतं. त्यामुळे त्यानं वडिलांच्या हत्येची योजना आखली. मात्र तितक्यात आईला जाग लागली. त्यामुळे आर्यन आणि त्याच्या मित्रानं तिचीदेखील हत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सोमवारी रात्री जोडप्याची हत्या झाली. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर एडीजींसह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केलं. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यानंतर मृत जोडप्याच्या मुलाची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी आर्यन आणि त्याचा मित्र आदित्यला अटक केली. ‘घरातील सततच्या वादांना आर्यन वैतागला होता. मद्यपी वडील दररोज आईला मारहाण करायचे. त्यामुळेच आर्यननं वडिलांना संपवण्याची योजना आखली. या कटात त्यानं मित्राला सहभागी करुन घेतलं,’ असं पोलिसांनी सांगितलं. ‘आर्यननं योजनेनुसार वडिलांना मँगो मिल्कशेकमधून गुंगीच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर रात्री उशिरा घरी येऊन मित्रासोबत वडिलांची हत्या केली. आर्यन आणि आदित्य हत्या करत असताना पलंगावर झोपलेल्या आईला जाग आली. तिनं पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला. वडिलांना संपवणाऱ्या आर्यननं आईचादेखील गळा चिरला. हत्येनंतर दोघे फरार झाले. पोलिसांनी दिवसभर तपास करुन पुराव्यांच्या आधारे दोघांना रात्री अटक केली,’ अशी माहिती मेरठचे एसएसपी रोहित सजवान यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here