FTR बुकिंग
जर तुम्हाला संपूर्ण ट्रेन बुक करायची असेल तर हे देखील करता येईल. ही व्यवस्था भारतीय रेल्वेकडून कंपनी, वैयक्तिक किंवा राजकीय पक्षांना दिली जाते. या सुविधेला फ्री टॅरिफ रेट (FTR) बुकिंग म्हणून ओळखले जाते. मात्र, त्यासोबत लोकांना काही अटींचे पालन करावे लागते. तसेच हवे असल्यास तुम्ही ट्रेनमध्ये डबेही जोडू शकता.
संपूर्ण ट्रेन कशी बुक करायची?
जर तुम्हाला संपूर्ण ट्रेन किंवा एखादा डबा बुक करायचा असेल, तर तुम्हाला IRCTC वेबसाइटवर जाऊन FTR सेवेला जावे लागेल. येथे तुम्ही आयडी पासवर्डद्वारे लॉगिन करा आणि आवश्यक माहिती योग्यरित्या भरा. यानंतर, तुम्हाला तारीख आणि इतर माहिती भरून ऑनलाइन पैसे भरावे लागतील.
भाडे किती असेल?
जर तुम्हाला एकच डबा बुक करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला किमान ५० हजार रुपये मोजावे लागतील, तर १८ डब्यांची ट्रेन बुक करायची असेल तर तुम्हाला ९ लाख रुपये खर्च करावा लागेल. याशिवाय ७ दिवसांनंतर थांबवण्याचे शुल्क १०,००० रुपये प्रति कोच अतिरिक्त आहे.
बुकिंगचेनियम
तुम्ही ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, सेकंड एसी, सेकंड एसी, थर्ड एसी (थ्री टायर), एक्सक्लुझिव्ह चेअरकार, एसी चेअरकार, एचबी, एसए, सेकंड क्लास जनरल, पॅंट्रीकार, एसी सलून, नॉन एसी सलून, एसएलआर, स्लीपर, उच्च क्षमतेची पार्सल व्हॅन, जनरलव्यतिरिक्त इतर डबे जोडू शकता. तुम्हाला ज्या ट्रेनची बूकींग करायची आहे, त्यात १८ ते २४ डबे असतील.त्या ट्रेनमध्ये तीन SLR कोच आवश्यक आहेत.जर तुम्हाला कमी डबे घ्यायचे असतील तर तुम्हाला १८ कोच एवढी सुरक्षा ठेव भरावी लागेल. तसेच ट्रेनमध्ये दोन स्लीपर कोच अनिवार्य असून तुम्हाला १ ते ६ महिने अगोदर बुकिंग करावे लागेल. तसेच, तुम्ही बुकिंगच्या तारखेच्या दोन दिवस आधी बुकिंग रद्द करू शकता.