आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली. ठाकरे घराण्यातील व्यक्तीचा अशा प्रकारच्या घटनेत सहभाग असेल असं मला वाटत नाही. भाजपच्या आरोपामुळेच हा वाद सुरू झाला आहे. सुशांतप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सर्वांनीच केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेलं आहे. त्यामुळे चौकशी होत असल्याने त्यातून सत्य बाहेर येईल, असं बाळ नांदगावकर यांनी सांगितलं.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यपक्षपणे आरोप करण्यात येत होते. बिहार भाजपने तर थेट आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते यांची नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झाली आहे. शिवसेनेनेही या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव नाही. आदित्य यांचं कुणीची नाव घेतलेलं नाही. मीडियानेच सनसनाटी निर्माण करण्यासाठी त्यांचं नाव पुढे केल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर मनसेने आदित्य यांची बाजू घेऊन संकटाच्या काळात मतभेद विसरून ठाकरे कुटुंब एकत्र येत असल्याचा संदेशच दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काय म्हणाले होते राऊत
आदित्य ठाकरे यांचा सुशांत प्रकरणाशी काहीही संबंध नाही. याप्रकरणात त्यांचं नाव कुणीही कधीही घेतलेलं नाही. तुम्ही मीडियाच या प्रकरणात आदित्य यांचं नाव घेत आहे. सध्याची पत्रकारिता कशी आणि कोणत्या पद्धतीने सुरू आहे हे सर्वजण पाहातच आहे, अशी टीका राऊत यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयात कुणीही कुणाचं नाव घेऊ शकतो. बड्या लोकांची नावं घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकरणाला सनसनाटी मिळत नाही. त्याला प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळेच अशी नावं मीडियाकडून घेतली जातात, असंही ते म्हणाले. सुशांतला खरोखरच न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्याच्या कुटुंबीयांसहीत सर्वांनी शातं राहावं. पोलिसांना त्यांचा तपास करू द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
Thanks so much for the blog post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.