पण, लग्नास नकार का?
लग्नापूर्वी वधूने वराचा फक्त फोटो पाहिला होता. लग्नाच्या दिवशी जेव्हा ती हातात हार घेऊन स्टेजवर पोहोचली तेव्हा तिने पहिल्यांदा होणाऱ्या नवऱ्याला प्रत्यक्षात पाहिलं. त्याचा सावळा रंग पाहून तिला धक्काच बसला. इतकंच नाही तर दोघांच्या वयातही तिला फार फरक जाणवला. त्यानंतर तिने थेट लग्न करण्यास नकार दिला. तसेच, कोणाच्याही दबावाखाली येऊन लग्न करुन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही, असंही तिने स्पष्ट केलं. तिने वराच्या गळ्यात हार घालणार नाही, असं सांगितलं.
डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वी वधूने लग्नास नकार दिल्याने वर-वधू पक्षात एकच खळबळ माजली. दोन्ही बाजुचे लोक वधूला समजावू लागले. पण, तिने स्पष्टपणे सांगितलं की तिला इतक्या सावळ्या आणि वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य घालवता येणार नाही. तिला स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे नाहीये.
सुरुवातीला वराच्या नातेवाइक रागावले. पण, नंतर परीस्थिती अधिकच बिघडत असल्याचं पाहून त्यांनी वधूची विनवणी केली. पण, ती आपल्या निर्णयावर ठाम होती. वधूच्या जिद्दीपुढे कोणाचंही काही चाललं नाही. अखेर वऱ्हाड्यांना खाली हाताने परतावे लागले. वराची कमाई आणि संपत्ती पाहून मुलीच्या कुटुंबीयांनी लग्न निश्चित केले होते, अशीही माहिती आहे.