पुणे : पुण्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. घरासमोर शांततेत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना आणि नागरिकांना लोणी काळभोर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

विशेष बाब म्हणजे, अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याबरोबरच, महिलांनाही शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्याने पोलिसांच्या विरोधात लोणी काळभोर नागरीकांमध्ये रोष पसरला आहे.
Karnataka CM : सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, डी. के. शिवकुमारांचं काय होणार? कर्नाटकचा फॉर्म्युला ठरला
पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे असं मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून, वैभव मोरे यांच्यासमवेत असलेल्या पोलिसांनी अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याबरोबरच महिलांनाही शिवीगाळ केल्याचा आरोप भोसले चाळीतील नागरिकांनी केला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे आणि त्यांच्या सहकारी पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी संतोष भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीमधील स्थानिक नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार, पदाधिकारी संतोष भोसले यांचा वाढदिवस असल्याने चाळीतील काही नागरिक घरासमोरील रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापत होते. या कार्यक्रमासाठी अल्पवयीन मुले तसेच महिलाही हजर होत्या. त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे आणि त्यांचे चार सहकारी पोलिसांच्या वाहनातून घटनास्थळी आले.

पोलिसांनी गाडीतून उतरताच केक कापणाऱ्या नागरिकांना आणि अल्पवयीन मुलांना समज देण्याऐवजी हातातील काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मुलांना मारहाण करु नये यासाठी काही महिलांनी पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैभव मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलांना देखील शिवीगाळ करण्याबरोबरच दिसेल त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

वैद्यनाथ कारखाना निवडणुकीत पंकजांसह तिन्ही बहिणी-मातोश्रींचा अर्ज, धनंजय मुंडेंमुळे ट्विस्ट
पोलीस मारहाण करत असल्याचं पाहून संतोष भोसले आणि त्यांच्या घरातील नातेवाईकांनी पोलिसांना हा सर्व प्रकार थांबवण्याची विनंती केली. मात्र, वैभव मोरे यांनी भोसले कुटुबियांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा प्रकार १० ते १५ मिनिटे सुरु होता. हा प्रकार मोबाईलमध्ये शूट होत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी मोबाईल देखील जप्त करुन मोबाईलमधील व्हिडिओ डिलिट केले.

अल्पवयीन मुलांना आणि नागरिकांना होत असलेली मारहाण वाढत चालल्याने स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करुन मारहाण थांबवली. तसेच पोलिसांच्या विरोधात नागरिक पोलीस ठाण्यात पोहोचले. नागरिकांमध्ये पोलिसांच्या विरोधात असलेला राग पाहून संतोष भोसले यांनी वैभव मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत लेखी अर्ज दिला.
Sangli Accident: कोल्हापूरहून पंढरपूरला निघालेले, सांगलीत विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची बोलेराला धडक, ५ जण ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here