नागपूर: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देण्याच्या बहाण्याने एका तोतयाने भाजप नेत्यांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून या व्यक्तीने सहा आमदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.यातील दोन-तीन आमदारांनी या व्यक्तीला लाखो रुपये दिल्याचे समजते. मात्र पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. मंगळवारी रात्री उशिरा नागपूर पोलिसांनी त्याला गुजरातमधील मोरबी येथून ताब्यात घेतले. नीरजसिंग राठोड असे आरोपीचे नाव आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार ऑगस्ट २०२२ मध्ये झाला. यामध्ये भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशा स्थितीत मंत्रीपदासाठी घोडेबाजार होतो की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

मविआच्या लोकसभा निवडणूक समितीत संजय राऊतांचं नाव फिक्स, दुसरा नेता कोण असणार, उद्धव ठाकरे कुणाला संधी देणार?

गेल्या काही दिवसांपासून नीरजसिंह राठोड हा आमदारांच्या फोनवर संपर्कात होता. जेपी नड्डा यांच्या जवळचा असल्याचा दावा त्यानी केला. त्यांच्याकडे मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष निधी म्हणून दोन कोटी रुपये द्या, असे तो बोलला काही दिवसांपूर्वी नागपूरचे भाजप आमदार विकास कुंभारे, टेकचंद सावरकर यांचा फोन आला होता. ज्यामध्ये नीरज सिंह राठौर नावाच्या व्यक्तीने भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचा दावा करत त्यांनी मोठ्या रकमेची मागणी केली. विकास कुंभारे यांनी याबाबत माहिती गोळा केली आणि नीरज सिंह राठोड नावाची कुठलीही व्यक्ती जे.पी. नड्डा यांच्या जवळची नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून नागपूर पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे.

नवनीत राणांविरोधात ठाकरे गटाचा शड्डू, अमरावती लोकसभेची जागा जिंकण्यासाठी रणनीती

चौकशीत धक्कादायक माहिती, जे.पी. नड्डांसोबत बोलणंही करुन दिलं

आपण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे खरेखुरे पीए आहोत हे पटवून देण्यासाठी नीरजने आपल्या एका साथीदारालाच नड्डा बनविले होते. त्याच्या सापळ्यात सापडलेल्या आमदाराला तो फोनवरून तोतया नड्डासोबत बोलणे करून द्यायचा. नीरजच्या सापळ्यात कोण कोण अडकले आणि किती रुपयांनी लुटले गेले ते लवकरच पोलीस तपासातून पुढे येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here