पुणे: पुणे शहरात सोनसाखळी चोरीचा घटना रोज वाढत आहे. शहरात तीन ते चार सोनसाखळी चोरण्याचा घटना शहरात समोर येत आहे. अशी एक घटना काल १६ मे रोजी दुपारी ३.३०च्या सुमारास घडली.एक डॉक्टर महिला गुवर पेठ परिसरात चालत घरी जात असताना एक चोरट्याने महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी चोरून पलायन केले. तेव्हा तेथे क्रिकेट खेळत असलेल्या स्थानिक तरुणांनी चोराचा पाठलाग करून चोराला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिली. चोरला पकडणाऱ्या तरुणांचा पोलीस सहाय्यक आयुक्त सतिश गोवेकरने सत्कार केला. महेश लक्ष्मण सावंत (रा. थेरगाव, वाकड पुणे) असा या आरोपीच नाव आहे. खडक पोलिसानी त्याला अटक केली असून त्याच्यवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस स्टेशन च्या हद्दीत गुरुवार पेठ परिसरात डॉक्टर आपल्या घरी जात असताना एका सोनसाखळी चोराने महिलेचा गळ्यातली सोनसाखळी चोररून पळून जात होता. मात्र महिलेने जोर जोरात आरडा ओरडा केला, हे पाहून स्थानिक क्रिकेट खेळणारे तरुणांनी चोराचा पाठलाग करून त्याला पकडलं आणि पोलिसांनाच्या ताब्यात दिल. या घटनेनंतर तरुणांनाच कौतुक केलं जातं आहे.

MI Playoffs Scenario:मुंबई इंडियन्ससाठीचे प्लेऑफचे समीकरण; चक्क हार्दिक पंड्या मदतीला येऊ शकतो
चोरी करून पळून जाणाऱ्या आरोपीस मोठ्या धाडसाने पकडणारे स्थानिक तरुण नागरिक गोवर्धन विलास गोगावले, हेमंत विनायक झेंडे , उमेश काशीद, अभिषेक दिगंबर जाधव यांनी दाखवलेल्या तत्परतेबाबत व धाडसाबाबत सतीश गोवेकर, सहायक पोलिस आयुक्त, फरासखाना विभाग व संगीता यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,खडक पोलीस स्टेशन यांनी या तरुणांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे आभार मानले. तसेच या निमित्ताने नागरिकांनी देखील अशा प्रकारे धाडस दाखवून मदतीला पुढे यावे, असे आवाहन खडक पोलिसांमार्फत करण्यात येत आहे .

पुणेकर ऐकत नाय! हापूस परवडेना म्हणून थेट आंबा EMIवर, विक्रेत्याची भन्नाट कल्पना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here