हसन मुश्रीफ यांच्या हस्ते काल गुरुवारी कागल येथे कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी करोना मृत्यूदरावर चिंता व्यक्त केली. जिल्ह्यातील करोनाचा मृत्यूदर कमी करायचा असेल तर करोना संशयिताच्या रिपोर्टची वाट न पाहता त्यांच्यावर उपचार सुरू करा. करोनासदृश्य लक्षणे दिसताच रुग्णावर करोनाचे उपचार सुरू करा, असा अजब सल्ला मुश्रीफ यांनी दिला आहे. एखाद्या रुग्णाला केवळ करोनाची लक्षणे दिसत असेल पण तो कोविड पॉझिटिव्ह नसेल तर त्याच्यावर करोनाचे उपचार केल्यास रिअॅक्शन होणार नाही का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करा आणि अँटिजेन टेस्टची संख्या वाढवा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिल्या. दरम्यान, कोल्हापुरात आतापर्यंत १२ हजार १३ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ५ हजार ६३० रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३१२ जणांचा आतापर्यंत करोनाने मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात ६ हजार ७१ रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.
वाचाः
तर, राज्यात काल ११ हजार ८१३ नवीन रुग्ण आढळल्यानं राज्यातील एकूण रुग्णसंख्या ५ लाख ६० हजार १२६च्या घरात पोहोचली आहे. तर, मुंबई महापालिका हद्दीत १ हजार २०० रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. राज्यात सध्या १० लाख २५ हजार ६६० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ३६ हजार ४५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज ४१३ करोना मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण करोना मृतांचा आकडा आता १९ हजार ०६३वर पोहोचला आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ इतका झाला आहे. काल नोंद झालेल्या ४१३ करोना मृत्यूंपैकी २८८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५१ मृत्यू ठाणे जिल्हा-३१, जळगाव-४, पुणे-३, नाशिक-३, पालघर-३, लातूर-२, उस्मानाबाद-२, रायगड-१, वाशिम-१ आणि औरंगाबाद-१ असे आहेत.
वाचा
वाचाः
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
A big thank you for your article.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.