पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील चिखली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिखली परिसरात असणाऱ्या एका जलतरण तलावामध्ये बुडून एका १७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मंगलवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. जलतरण प्रशासनाविरोधात चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने चिखली परिसरात एकच खळबळ उडाली होती. हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.राहुल वाघमोडे (वय १७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी राहुलचा चुलत भाऊ सुरज मलिक्का अर्जुन वाघमोडे (वय २९ धंदा व्यवसाय रातथास्तु पॅराडाईज, कंद पाटील नगर देहुरोड) याने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिखलीतील मोरवस्ती परिसरात ते रहात होते.

बँकेच्या त्या निर्णयाने शेतकऱ्याला बसला मोठा धक्का, शेवटी व्हायला नको तेच घडले, सारेच संपले
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल वाघमोडे हा मंगळवारी चिखली परिसरातील साईॲक्वा मरीन या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. सुरजने तलावावर नियंत्रण ठेवणाऱ्या इतर जबाबदार व्यक्तींच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे राहुलचा जीव गेला असे म्हटले असून संबंधित प्रशासनाला जबाबदार धरले आहे.

या घटनेने वाघमोडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. जलतरण तलाव प्रशासनामुळे विजयाचा जीव गेला असल्याचे फिर्यादीत सांगण्यात आले आहे. या घटनेसाठी जलतरण तलाव प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आली नव्हती. तसेच सीसीटीव्ही देखील या परिसरात लावण्यात आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

माळशेज घाटमार्गे मुंबईला जाताय?; या कालावधीत हा मार्ग राहील बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
पोलिसांनी कलम ३०४ (अ), ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या चिखली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मुलांना पोहता येत नसेल तर त्यांना पालकांनी पोहायला पाठवू नये, योग्य ती खबरदारी घेऊन पालकांनी मुलांसोबत पोहण्यासाठी जाणे गरजेचे आहे. तसेच स्विमिंग पुल ऑथरीटिने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
धक्कादायक! अल्पवयीन मुलीला धमकी देत वारंवार अत्याचार, जे पुढे घडले त्याने पालक हादरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here