लखनऊ: हुंड्यात १० लाख रुपये आणल्याशिवाय शारीरिक संबंध ठेवणार नाही, असं सांगत पती जाच करत असल्याची तक्रार घेऊन एक तरुणी पोलिसांत गेली. तिथे तिने जे सांगितलं त्याने पोलिसही हैराण झाले. लग्नाला तीन महिने उलटूनही पतीने अजून स्पर्श केला नसल्याचं या महिलेने सांगितलं आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.हुंडा म्हणून १० लाख रुपये न मिळाल्याने लग्नाला तीन महिने उलटूनही पतीने शारीरिक संबंध ठेवले नसल्याचा आरोप आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये ५ लाखांच्या हुंड्याची बोलणी झाली होती. त्यानंतर नववधू पतीसह हनिमूनला नैनितालला गेले. नैनितालमध्येही पती हा नववधूपासून लांब राहिल्याचा आरोप आहे.

घरातून निघाली, प्रियकराच्या घरी गेली अन् आयुष्य संपवलं; तरुणीच्या डायरीमुळे गूढ उकललं…
इतकंच नाही तर नैनिताल असताना पतीने अश्लील छायाचित्रे काढल्याचा आरोप पत्नीने केला आहे. यानंतर त्याने ब्लॅकमेल करत हुंड्याची मागणी सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. व्यथित झालेल्या पत्नीने पिलीभीत कोतवाली पोलिस ठाण्यात सासू आणि पतीविरुद्ध तक्रार दाखल करत न्यायाची याचना केली. पती आणि सासू तिच्यावर अत्याचार करून हुंड्याची मागणी करत असल्याचा आरोप नववधूने केला आहे.

पीडितेचे म्हणणे आहे की, तिचा विवाह ६ फेब्रुवारी २०२३ रोजी बदाऊन पोलिस स्टेशनच्या बिसौली भागातील एका तरुणाशी झाला होता. तिच्या घरच्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार लग्नासाठी २० लाख रुपये खर्च केले होते. यामध्ये १५ लाखांचे दागिनेही हुंडा म्हणून देण्यात आले होते. पण, पतीने लग्नानंतर नववधूला स्पर्शही केला नाही. तसेच, लग्नाच्या ३ महिन्यांनंतरही पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. २९ मार्च रोजी तिने सासूला या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यांनीही त्याकडे लक्ष दिले नाही.

अक्षता घेऊन सारे तयार, वर-वधूच्या हातात हार; पण तेवढ्यात ती म्हणाली, लग्न नाही करणार, कारण…
काही दिवसांनी पीडित मुलगी पिलीभीत येथील तिच्या माहेरी आली आणि तिने सर्व प्रकार आईला सांगितला. यानंतर २२ एप्रिल रोजी पीडितेचा पती तिला घेण्यासाठी पिलीभीत येथे आला असता, तिच्या आईने जावयाला विचारले की आजार असेल तर सांगा, आपण उपचार करु. यावर नवरा म्हणाला, १० लाख रुपये द्या मग आम्ही हनिमूनला जाऊ.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

यावर कुटुंबीयांनी ५ लाख रुपये दिले आणि ७ मे रोजी दोघेही हनिमूनला नैनितालला गेले. वधूने सांगितले की ती तिच्या पतीसोबत एकाच खोलीत राहिली. तिथे पतीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवले. उरलेले ५ लाख रुपये घेऊन ये म्हणाला. तसेच, न दिल्यास हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकीही दिली.

१३ मे रोजी पीडित महिला पतीच्या घरातून माहेरी आली आणि तिने सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर पीडितेने पिलीभीत पोलिस ठाण्यात सासू आणि पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here