पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, या महिलेने १४ मे २०१६ रोजी सरखेज येथे राहणाऱ्या एका तरुणाशी विवाह केला. सुरुवातीला पतीचा व्यवहार अतिशय चांगला होता. मात्र, सन २०१८ मध्ये त्यांना पहिले मूल झाल्यानंतर त्याची वागणूक बदलली. गेल्या काही महिन्यांपासून पतीने पीडित महिलेसोबत ठेवणेच बंद केले. जेव्हा जेव्हा पत्नीने पतीकडे शरीरसंबंधाची मागणी केली, तेव्हा तेव्हा पतीने सतंप्त होऊन तिला मारहाण केली आहे.
आपल्या पतीने सन्यास घेतला असल्याचा दावा केल्याचे पीडित महिलेने सांगितले. पीडित महिलेने शरीरसंबंध ठेवण्यासाठी आपल्या पतीवर दबाव टाकल्यानंतर पती घर सोडून निघून गेला. त्याच प्रमाणे त्याने मुलांची देखभाल करणेही सोडून दिले. गेल्या काही महिन्यांपूर्वी पीडित महिलेच्या एका मुलाच्या पोटात संसर्ग झाला होता. तिने पतीकडे उपचारासाठी पैशांची मागणी केल्यानंतर पतीने पैसे देण्यास नकार दिला होता. पत्नीने आपल्या पतीविरोधात तक्रा र दाखल केली असून पोलिसांनी अद्याप पतीला अटक केलेली नाही.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times